भारत पाक युद्ध १९७१ : प्रहार

Featured
India-Pakistan War Part 2

२०२१ हे वर्ष भारतासाठी महत्वपूर्ण वर्ष आहे येत्या १५ ऑगस्टला भारत आपल्या स्वतंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे तर ह्याच वर्षी भारत पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत,भारत सुवर्ण विजय वर्ष म्हणून साजरे करत आहे.साहस,शौर्य,प्रतिष्ठित भारतीय सशस्त्र दलला मनाचा मुजरा…

सुवर्ण विजय दिवस १९७१

१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाला समजून घेण्यासाठी पहिले ह्या युद्धाची पाश्र्वभूमी काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे जर तुम्ही पार्श्वभूमी समजून नाही घेतली तर ह्या भागातले तुम्हाला काहीच कळणार नाही,ह्या युद्धाची पार्श्वभूमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

गंगा अपहरण

लंडनमध्ये असणाऱ्या रॉ गुप्ताचारकडून एक बातमी आली,पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख याह्या खान हे पूर्व पाकिस्तानवर लवकरच लष्करी हल्ला करणार आहेत.रॉची सर्व तयारी हि पाकिस्तानच्या निवडणूक जाहीर होण्यागोदरच झाली होती.रॉ आता पूर्व पाकिस्तानमधील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत होती.पाकिस्तानला जर पूर्व पाकिस्तानमध्ये जायचे असाल तर त्यांना भारताच्या हद्दीतून हवाई प्रांतातून जावे लागत होते.हे संबंध तोंडाने आता गरजेचे होते पण ते कसे तोडायचे असा विचार रॉचे काव हे करत होते आणि त्यांच्याकडे एक गुप्त बातमी आली,आयएसआय च्या दोन गुप्तचरांना सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच बीएसएफच्या जवावानांनी भारतात घुसखोरी करताना पकडले आहे.त्यांचा पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव गांधी हे जे विमान उडवणार असतील तेच विमान अपहरण करून पाकिस्तानला नेयचे होते आणि भारताला कोंडीत पकडायचे.आणि रॉप्रमुख काव यांच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली त्यांनी पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा डाव आखला.त्या दोन आयएसआय गुप्तहेरांना रॉचा हस्तक बनवण्यात आले.

३० जानेवारी १९७१ ला भारतीय ताफ्यातले फॉकर एफ-२७ (गंगा) ह्या विमानाचे अपहरण करून ते लाहोरला नेण्यात आले,आणि त्याबदल्यात भारताकडे कैदेत असलेले ३६ आतंकवादी याना मुक्त करण्यात यावे अशी मागणी ठेवण्यात आली.आता झाली पंचाईत पाकिस्तानने भारताला कोंडीत पकडले म्हणून पाकिस्तानी जनता लाहोर हवाईअड्ड्यावर येऊ लागली भारतविरोधी घोषण्या देण्यात आल्या.ते दोन आतंकवादी पत्रकारांना जाहीर मुलाखती देऊ लागले,सर्वत्र चर्चा सुरु झाली पाकिस्तानी जनता उत्सव साजरा करत होती.ज्यांनी गंगा हे विमान अपहरण केले होते त्यांचा मस्त पाहुणचार चालला होता.१ फेब्रुवारी १९७१ दिवशी त्या आतंकवाद्याची चर्चा पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फिकार भुट्टो याच्यासोबत झाली आणि अपहरण केलेले सर्व प्रवासी यांना सोडण्यात आले.आणि गंगा ह्या विमानाला आयएसआयने आग लावली.भारताचे नाक कापण्याचा तो डाव होता पण भारत तरी काय करणार होता निषेध! पण हे प्रकरण जसं दाखवलं जात होतं तसं ते होतं का? ह्या नाट्यथराराचा मास्टरमाइंड होते रॉ प्रमुख काव. गंगा विमानाचे अपहरण करून लाहोरला घेऊन जाणे तिथे जाऊन सर्व पत्रकारांना त्या आतंकवाद्यांमार्फत मुलाखती देणे आणि सर्वाच्या सर्व भारतीयांना त्यांच्या केसालाही धक्का न लावता भारतात परत सुखरूप आणण्याचा तो डाव होता.आणि ते २ आयएसआयचे आतंकवादी हे रॉचे हस्तक होते.आता पाकिस्तानची कोंडी झाली भारताकडून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान कसा आतंकवाद्याला संरक्षण देऊन भारताविरुद्ध कारवाया करत हे अनेक पुराव्यांसह सिद्ध करण्यात आले आणि पाकिस्तानच्या सर्व हवाई जहाजांना भारतीय हवाई हद्दीतून ये-जा करण्यास बंदी घातली गेली.आणि ज्या विमानाला आग लावण्यात आली होती ते विमान भारताच्या ताफ्यातून बादच करण्यात आले होते अपहरणाच्या काही दिवस आधीच ते विमान पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.हीच आहे आपली रॉ.

पाकिस्तानी गुप्त संघटनेने भारताचे भंगार झालेले विमान जाळून टाकले

भुज हवाई अड्डा

पूर्व पाकिस्तानमधून आलेले शरणार्थी

पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराचा नंगानाच चालू होता बंगाली जनतेला हालहाल करून मारले जात होते भररस्त्यात मुलींचे बलात्कार होत होते,ह्या जाचाला घाबरून कित्येक बंगाली जनता आता भारताच्या हद्दीत शरणासाठी येत होते आणि ह्यांची संख्या वाढतच चालली होती. १० लाख २० लाख, ३० लाख, ४० लाख आता मात्र भारताच्या तिजोरीवर ह्याचा परिणाम होऊ लागला.५ नोव्हेंबर १९७१, सकाळी ८ वाजता वॉशिंग्टनमध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन,किसिंजर आणि हाल्डेमन यांच्यात चर्चा चालू होती पूर्व पाकिस्तानमधील होत असलेल्या नरसंहाराची.ह्या चर्चेत निक्सन म्हणाले धिस इज द पॉईंट व्हेन शी(इंदिरा गांधी) इज ए बीच.अमेरिका हि पहिल्यापासून पाकिस्तानच्या बाजूनेच होती ते भारताची कोणतीही मदत करत नव्हते उलट भारतावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते.पण म्हणतात ना झोपलेल्या वाघाला कधी डिवचू नये कदाचित तो योग्य संधीची वाट पाहत असेल आणि ३ डिसेंबर १९७१ संध्याकाळी पाकिस्तान हवाई दलाने भारताच्या ११ हवाईअड्ड्यांवर बॉम्बने हल्ले करायला सुरवात केली.ह्या ऑपेरेशनला पाकिस्तानने ऑपेरेशन चंगेझ खान हे नाव दिले.

भारतातील अमृतसर,अंबाला,आग्रा,अवंतिपुर,बिकानेर,हलवार,जोधपूर,जैसलमेर,पठाणकोट,भुज,श्रीनगर आणि उत्तरलाई ह्या हवाई अड्ड्यांवर नॅपलम बॉम्बने हल्ले करून भारतीय सेनेच्या हवाई उडाणपट्टी उध्वस्त करण्याचा बेत पाकिस्तान हवाई दलाचा होता आणि त्यांनी ते उध्वस्तहि केले,पण आग्रामध्ये येऊन त्यांनी बॉम्बहल्ला केला होता ह्याचा विचार नव्हता केला आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी भारतीय रेडिओवरून भारत पाकिस्तान युद्धाला सुरवात झाली आहे असा संदेश भारतीयांच्या नवे दिला.भारताला ऑपेरेशन चंगेझ खानला उत्तर तर देयचे होते पण कसे देणार कारण सर्व फॉरवर्ड एअर बेसेस वर बॉम्बहल्ला झाला होता.ते दुरुस्त करण्याचे कामही चालू होते पण सततच्या हल्ल्यामुळे वेळही जात होता आणि सर्वात जास्त बॉम्बहल्ले हे गुजरातमधील भुज ह्या हवाई अड्ड्यावर करण्यात आले होते जवळ जवळ १८ नेपालम बॉम्ब एकट्या भुज एअर बेसवर करण्यात आले होते.अचानक झालेल्या ह्या हल्ल्यामुळे उडाणपट्टी दुरुस्त करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत होते.भुज ह्या हवाई अड्ड्यावर तैनात असलेले भारतीय हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक ह्यांच्या लक्षात आले हवाईपट्टी दुरुस्त करण्यासाठी खूप मनुष्यबळाची गरज आहे म्हणून त्यांनी भारतीय सीमा सुरक्षा दलाची मदत मागितली परंतु युद्धजन्य परिस्थती असल्या करणारे जास्त जवान एकाच ठिकाणे देणे हे परवडण्याजोगे नव्हते जेमतेम १०० जवान विजय कर्णिक ह्यांना देण्यात आले परंतु तेपण पुरेसे नव्हते.

नेपाल्म ह्या बॉम्बची तीव्रता

म्हणून त्यांना एक कल्पना आली जवळच्या असलेल्या माधापूर गावच्या लोकांकडे त्यांनी मदत मागितली त्यांना प्रोत्साहित करून ३०० महिला ह्या फक्त आणि फक्त देशावर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी तयार झाल्या.युद्ध पुकारले असताना सारखे बॉम्बहल्ले होत असताना कोणतीही हवाई मदत भेटत नसताना ह्या महिला जीवाची पर्वा ना करता तयार झाल्या कित्येक महिलांना लहान लहान मुले होती तरीही त्या तयार झाल्या,काम सुरु झाले पहिल्या दिवशी त्या महिलांना जेवायला सुद्धा मिळाले नाही पण कोणतीही तक्रार न करता त्या काम करत राहिल्या दुसऱ्या दिवशी मात्र जवळच्या जावांकडून मंदिरातून त्यांना जेवण भेटू लागले.

भुज हवाईपट्टी दुरुस्त करताना माधापूर गावातील महिला

काम जोखमीचे होते,पाकिस्तान सीमा जवळच होती मोकळ्या आकाशाखाली त्या महिला न थांबता काम करत होत्या भारतीय हवाई दलाच्या जवानांना जर पाकिस्तानचे विमान येण्याचा काही सुगावा लागला तर लगेच भोंगा वाजवला जाई आणि सर्वाना एका सुरक्षित छत्राखाली आणले जाई.पाकिस्तानी हवाई दलाला वरून खाली काम करत असलेल्या महिला दिसू नयेत ह्यासाठी त्यांना हिरव्या रंगाची सारी नेसण्यास सांगितल.जेणेकरून जवळच्या गवताच्या रंगाशी मिळतेजुळते राहील,जशी जशी हवाईपट्टी पूर्ण होत जाई तिला शेणाचे सारवून हिरव्या रंगाची केली जाईल अश्या प्रकारे पाकिस्तानी हवाई दलाला चकवून हि हवाई पट्टी अवघ्या ७२ तासात पूर्णपणे दुरुस्त करून झाली.जीवाची पर्वा न करता मातृभूमी हीच सर्वोपरी फक्त आणि फक्त देशभतीच्या भावनेपायी ह्या महिला आल्या होत्या,युद्ध संपल्यावर इंदिरा गांधींनी ह्या ३०० महिलांना आर्थिक बक्षिसे देऊ केली पण त्यांनी स्वीकारली नाहीत त्या म्हणाल्या आम्ही कोणतेही पैसे घेणार आंही आम्ही जे केले ते भारतासाठी केले आपल्या मातृभूमीसाठी केले.सलाम आहे त्या महिलांना ज्यांनी स्वतःच्या जेवाच विचार न करता हे देशकार्य केले.
          ७२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर भुज हवाई अड्ड्यावरून एकामागून एक भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमाने पाकिस्तानमध्ये घुसून घुसून एक एक हवाई अड्डे बरबाद करून टाकले उध्वस्त बेचिराख करून टाकले.

लोंगेवालाचे युद्ध

४ डिसेंबर १९७१ लोंगेवाला पोस्ट, थार वाळवंट,राजस्थान भारतीय सेनेचे जवान रात्रीच्या वेळेस गस्त घालत होते त्यांना खूप वाहनांचा आवाज आला म्हणून ते भारत पाक सीमारेषेच्या जवळ गेले आणि माहिती अधीकृत झाली कि पाकिस्तानी फौजेकडून हत्यारबंद वाहने भारतात दाखल होत आहे,हि माहिती लोंगेवाला पोस्ट व पंजाब रेजिमेंट २३ व्या पलटणचे नेतृत्व करत असलेले मेजर कुलदीप सिंग चांदपुरी ह्यांना देण्यात आली.मेजर चांदपुरी हे आपल्या १२० सैनिकांसह तिथे लोंगेवालाचे नेतृत्व करत होते आणि बाकीची फौज हि १७ किलोमीटर लांब साधेवला येथे स्थित होती.मेजर चांदपुरी यांनी मोर्चेबांधणीला सर्वात उंच अश्या टेकडीची निवड केली होती जेणेकरून शत्रू जर आला तर त्याला आपण असलेल्या उंचीचा फायदा घेऊन त्यांना टिपता येईल.त्यांच्याजवळ २ मिडीयम मशीन गनचा एक सेक्शन आणि एल ६१ मोर्टरचा एक सेक्शन म्हणजे ३ मोर्टर होत्या.आणि दुसरीकडे पाकिस्तान ६५ रांगड्यांसह सीमेवर येत होता.पाकिस्तानने लोंगेवालाची लष्करी चौकी म्हंजे पोस्ट सहज कब्ज्यात घेऊन पुढे जैसलमेरवर धडक मारण्याचा बेत केला होता.पाकिस्तनाची २८०० सैनिकांची मोठी तुकडी ६५ रणगाडे आणि ५०० इतर वाहनासह समोर आली होती रात्रीची वेळ होती आणि १२.३० रात्री लढाईला सुरवात झाली भारतीय सैनिक हे जेमतेम १२० होते आणि त्यांच्याकडे हत्यारांचा पुरेसा साठाही उपलब्ध नव्हता आणि मदतीला भारतीय हवाई दलाला येईल अजून ५ तास बाकी होते.कुठल्याही प्रकारे मदत येणार नव्हती त्यांना मागे सरकता आले असते त्यांना वरिष्ठानी चौकी सोडून माघार घेणे अथवा चौकीवर बसून राहून हल्ला चढवणे ह्याच्या निर्णय मेजर चांदपुरी ह्यांच्यावर सोडला,पण मेजर चांदपुरी हे एक पाऊलही मागे न सरकत पाकिस्तानी सैन्याला प्रतिउत्तर देत होते सैनिकांना प्रोत्साहित करत होते.लोंगेवला चौकीला पाकिस्तानी सैन्याने  वेढा घातला भारतीय जवान झुंज देत होते अक्षरशः त्यांनी पाकिस्तानच्या कमांडरचे तोंडाचे पाणी पळवले ते मेटाकुटीला आले.भारताचा एकही सैनिक जागेवरून हालत नव्हता सतत त्यांच्या चौकीतून गोळीबार चालू होता आणि जशी सूर्याची पहिली किरण आकाशात उधळण करत आली तेव्हाच भारतीय हवाई दलाची ४ हंटर विमाने पाकिस्तानच्या ताफ्यावर घिरट्या घालू लागली आणि बघताक्षणी भारतीय हवाई दलाकडून २३ रणगाडे आणि ५०० वाहनांचा चकणाचुर करून टाकला.

“चिड़ियों से मै बाज लडाऊ, गीदड़ों को मैं शेर बनाऊ

सवा लाख से एक लडाऊ, तभी गोबिंद सिंह नाम कहउँ”

गुरु गोविंद सिंह
विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना २३ पंजाब रेजिमेंटचे सैनिक

अगदी असच काहीसं झाले असणार लोंगेवाला मध्ये कारण भारताचा एक एक सैनिक पाकिस्तानच्या १५-१५ सैनिकांवर भारी पडत होता.अक्षरशः भारतीय जवानांनी पाकिस्तानची दाणादाण उडवून दिली आणि हेच होत असताना पाकिस्तानचे कमांडर यांनी पाकिस्तान सैन्याला मागे फिरण्याचे आदेश दिले आणि पाकिस्तानी तुकडी माघारी फिरू लागली आणि त्यात वेळेला ह्या पाकिस्तानच्या सैन्याचे नशीब एवढा खराब कि भारतीय शर्मन रणगाड्याचे पथक रणगांवर हजार झाले आणि माघारी फिरत असलेल्या पाकिस्तानच्या सैन्याची आणखीनच परिस्थती वाईट करून टाकली.ह्या लढाईत भारताचे २ जवान शहीद झाले आणि पाकिस्तानचे २०० पेक्षा अधिक सैनिक मृत्युमुखी पडले.पाकिस्तान एवढ्या मोठ्या सैन्याचे आणि एवढ्या रणगाड्यांसह भारताची सीमा ओलांडून येणार होता हे कळण्यासाठी भारताला वेळ लागला ह्यात भारतीय हेरखात्याचे म्हणजेच रॉचे अपयश होते पंजाब रेजिमेंटने जे साहस दाखवलं ते वाखाणण्याजोगे आहे शत्रूला पाठ न दाखवता आहे त्या रसदेसह शत्रूची झुंज पंजाब रेजिमेंटने दिली होती. ह्याच घटनेवर बॉर्डर हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

ऑपरेशन ट्रायडंट

ऑक्टोबर १९७१, ऑपेरेशन ट्रायडंट ह्या मोहिमेच्या २ महिने अगोदर तत्कालीन संरक्षण मंत्री जगजीवन राम,भारतीय नौदल प्रमुख एस एम नंदा आणि रॉ प्रमुख रामेश्वर नाथ काव यांच्यात एक बैठक झाली.भारतीय नौदलाला एक गुप्तबातमी कळली होती कि पाकिस्तानच्या कराची बंदरावर एक अत्याधुनिक अमेरिकन रडार प्रणाली बसवण्यात आली आहे जेव्हा भारतीय नौदल आणि हवाई दल लढाई दरम्यान जर पाकिस्तान वर हल्ला करण्यासाठी पश्चिमी किनारपट्टीवरून गेलं तर त्या रडार प्रणाली द्वारे पाकिस्तान आपल्यावर हल्ला करून आपल्याला नेस्तनाभूत करू शकत होतं ह्यासाठी ती प्रणालीवर हल्ला करणे गरजेचे होते पण हि बातमी खरी आहे का ह्याची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे होते.हे काम भारतीय नौदलाचे जवान करू शकत नव्हते कारण त्यांना त्याप्रकारचे प्रशिक्षण दिले गेले नव्हते.हे काम फक्त रॉच करू शकणार होती ह्यात काही शंका नव्हती.कराची बंदरावर हल्ला करायचा म्हणजे खात्रीशीर नियोजन आणि कुठल्या कोपऱ्यात किती अँगलला प्रतिहल्ला प्रणाली ठेवली आहे माहित असणे गरजेचे होते आणि ह्यासाठी कराची बंदराची ब्लु प्रिंट,खात्रीशीर व्हिजुअल दस्तऐवज म्हणजे उच्च दर्जाच्या फोटोंची गरज होती आणि हे काम फक्त रॉ प्रमुख काव ह्यांच्याच तोडीचे होते.हि सर्व माहिती गोळा करण्यासाठी कुशल,निडर बुद्धिमान गुप्तहेरांची गरज होती.आणि मग ठरले कराची बंदरात घुसून सर्व माहितीती गोळा करायची आणि पुढे भारतीय नौदलाला पाठवायची.ह्यासाठी एक नियोजनबद्ध आखाड्याची गरज होती.काव आणि रॉ उपप्रमुख शंकरन नायर यांनी त्यांच्याजवळ असलेल्या टॉप गुप्तचराला बोलावण्यात आले.आणि काय करता येईल ह्यावर विचारविनिमय सुरु झाला अचानक त्या गुप्तचराला एक कल्पना सुचली दोन महिने अगोदर म्हणजे जुलै दरम्यान डॉक्टर कावसजी ह्यांची एक बोट जी भारत आणि कुवेतला पाकिस्तानच्या कराची बंदरावरून सागरीमार्गातून प्रवास करते त्या बोटीला भारताच्या कस्टम विभागाने अनधिकृतपणे मालाची हेरफार केल्याप्रकरणी एक खटला चालू होता,आणि कावसजी ह्याच्यावर मोठा दंड ठोठावला होता.प्लॅन असा होता कि ह्या बोटींमधून रॉचे दोन गुप्तचर प्रवास करतील आणि सर्व माहिती गोळा करून येतील पण ह्यात जोखीम होती पाकिस्तानची आयएसआय हि गुप्तचर यंत्रणा नव्याने कार्यक्षम झाली होती.काही कुठे माहिती लीक झाली तर गोची होणार होती,म्हणून काव यांनी कस्टममध्ये असलेल्या निकटवर्तीयांशी पत्रव्यवहार करून डॉक्टर कावसजी यांची बोट सोडण्यास सांगितले आणि दंडाची जी काही रक्कम असेल ती रॉच्या फुंडमधून देण्यात येईल असे कळवण्यात आले.रॉचे दोन गुप्तचर डॉक्टर कावसजी ह्यांच्या बोटींमधून प्रवास करणार होते आणि त्या दोन गुप्तहेरांची नवे होती रॉड आणि मॉरीयार्टी हि त्यांची काही खरी नवे नव्हती त्यांची खरी नावे राव आणि मूर्थी हि होती.राव हे शंकरन नायर यांचे नौदल सहाय्यक होते तर मूर्ती हे रॉच्या फोटोग्राफी विभागातून फोटोग्राफी तज्ञ होते.ह्या योजनेअंतर्गत रॉला समजले कि अमेरिका हे गुप्तपणे पाकिस्तानला हत्यारांचा पुरवठा करत होते, आणि युद्धासाठी पाकिस्तानला कराची बंदर हे अतिशय उपयुक्त होते.
        रॉचे दोन गुप्तचर पाकिस्तानमध्ये दाखल होणार होते,भारत पाक युद्ध आता अटळ होते ह्यासाठी पाकिस्तान फौजेने बंदरावर चांगलाच बंदोबस्त लावला होता,प्रत्येक जहाजे,बोट,नौका मोठी मालवाहू जहाजे म्हणजे कार्गो शिप यांची कसून तपासणी चालू होती.डॉक्टर कावसजी यांच्या बोटीने भारताची सीमा सोडत आता कराचीच्या जवळ आली,काही वेळात त्यांची बोटहि कराची  बंदरावर आली आणि तितक्यात पाकिस्तान सिआयडीच्या अधिकारी तिथे आणि डॉक्टर कावसजी ह्यांची चौकशी सुरु झाली.रॉड आणि मॉरीयार्टी हे आत बसले होते ते कोण आहेत हे विचारताच कावसजी याना आता घाम फुटला आता जर आपण पकडलो तर आपली काही खैर नाही.सिआयडी अधिकारी आत जात असतानाच डॉक्टर कावसजी यांनी त्या अधिकारयांना थांबवले आणि म्हणाले ह्या दोघांना कांजण्या झाल्या आहेत म्हणून त्यांना वेगळे ठेवले आहे तुम्ही जर त्यांच्या जवळ संपर्कात गेलात तर तुम्हालासुद्धा होतील.डॉक्टर कावसजी हे कराची बंदरावरून नेहमी जात असल्यामुळे त्यांच्यावर संशय करण्याचे काही कारण नाही ह्या विचाराने त्यांनी बोटीला आत जाण्यास परवानगी दिली.काही काळ असाच घालवला गेला आणि मध्यरात्री बोट पुन्हा प्रवासाला लागली,रॉड आणि मॉरीयार्टी यांनी सर्व सामान आपल्या खाटेखालून वर काढले दुर्बीण,कॅमेरा आणि कॅमेरा बोटीच्या छोट्याश्या खिडकीतून थोडा बाहेर काढला.आणि सर्व निरीक्षण करत करत ते सर्व लिहून ठेवत होते अचानक त्यांना कळले कि काहीतरी नवीन बांधकाम चालू आहे तिथे एक अँटी एअर क्राफ्ट बॅटरी बसविण्यात आली होती ह्याचा सरळ सरळ अर्थ होता पाकिस्तान युद्धासाठी संपूर्णपणे तयारी करत होता.कोणत्याही क्षणी तो भारतावर हल्ला करणार होता.रॉड आणि मॉरीयार्टी यांनी पटापट सर्व तटबंद्यांचे,तोफांच्या अड्ड्यांचे,काही क्षेपणास्त्र नौकांचे फोटो काढले जवळ जवळ अर्ध्या तासानंतर ते तिथून निघून गेले.
      दुसऱ्या दिवशी दुपारी बोट तिथून कराची बंदरावरून कुवेतच्या दिशेने निघाली.रॉड आणि मॉरीयार्टी हे कुवेतमध्ये पोचताच तेथून लगेच कुवेतमधील भारतीय दूतावासात म्हणजे इंडियन एम्बसीमध्ये गेले तिथे त्यांनी तो कॅमेराचा रोल आणि काही कागदपत्रे लवकरात लवकर दिल्लीला पाठवण्यास सांगितले,आणि राव आणि मूर्ती हे दुसऱ्या दिवशी विमानाने प्रवास करून कुवेतून भारताकडे निघाले.रोल पाठवल्या त्या दुसऱ्या दिवशी सकाळी संरक्षण मंत्री जगजीवन राम ह्यांच्या टेबलवर अर्जेंट नावाचे एक इन्व्होलोप होते त्यात मूर्ती यांनी कॅमेरातून टिपलेली आख्या कराची बंदराची माहिती होती कुठे काय कुठल्या दिशेने काय ठेवले आहे सगळं काही त्यात होत.भारताकडे पहिल्यांदा कराची बंदराच्या आतील सर्व माहिती होती,ह्यामुळे भारतीय नौदलाला सर्व सरंक्षणार्थ केलेल्या मोर्चेबांधणीची इतंभूत माहिती आज भारताकडे होती,तसेच पाकिस्तानच्या वॉर शिप्स कुठे आहेत त्यांचे तेलाचे साठे कुठे आहेत गॅस पाईपलाईन कुठे आहेत सर्वांच्या सर्व माहिती फोटोग्राफ आता भारताकडे होते.

            भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल एस.एम.नंदा आणि पश्चिमी तटाचे नेतृत्व करत असलेले व्हाईस ऍडमिरल एस.एम.कोहली यांनी पाकिस्तानच्या एका बंदरावर हल्ला करून संपूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी एक मोहीम आखली नाव होतं ‘ऑपरेशन ट्रायडंट’.ह्या मोहिमेसाठी मिसाईल बोट स्क्वाड्रन मधल्या ३ विद्युत क्लास मिसाईल बोट निवड झाली पण त्या कमी वेळात जास्त अंतर कापू शकत नव्हत्या ह्यासाठी त्यांना लढाऊ जहाजाच्या मागे बांधून न्यावे लागणार होते.कराची पासून काही अंतर जवळ आल्यावर ह्या मिसाईल बोट ला वेगळे करून कराची बंदरावर हल्ला करण्याचे नियोजन होते. ह्या मोहिमेसाठी आयएनएस निपत,(आयएनएस म्हणजे इंडियन नेव्ही शिप) आयएनएस निर्घात आणि आयएनएस वीर ह्या तीन मिसाईल बोटींची निवड करण्यात आली प्रत्येक बोटीवर रशियन बनावटीची पी १५ टर्मिट ह्या पृष्ठभागावरुन जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल बसवण्यात आले,ह्या तीन बोटींसह भारताच्या शस्त्रसज्ज असलेले लहान संरक्षक जहाज आयएनएस किलतान आणि आयएनएस कचाल ह्यासोबत भारताचे फ्लीट टँकर आयएनएस पोषक ह्या बोटींचंसुद्धा समावेश करण्यात आला,आणि ह्या गटाचे नेतृत्व करणार होते कमांडर बबरू भान यादव.

पी १५ मिसाईल लोड करत असताना भारतीय सैनिक
पी १५ मिसाईलयुक्त भारतीय युद्ध नौका
ओखा नाविक तळावरून जाताना भारतीय लढाऊ नौका

           ४ डिसेंबर १९७१, गुजरातमध्ये असलेल्या ओखा ह्या भारतीय नाविक तळावरून भारताचे नौदल सर्व आयएनएस नौकांसह कराची बंदराच्या दिशेने निघाले.ह्या नौका बाणाच्या आकारात पुढे जात होत्या काही वेळात ह्या नौकानी सौराष्ट्र किनारपट्टीला वळसा घालून पुढे उत्तरेला निघाल्या.ह्या भारतीय नौकांचा मुख्य हेतू होता पाकिस्तानच्या कराची बंदराला आणि पाकिस्तानी लढाऊ नौकांना उध्वस्त करून कराची  बंदराला आग लावणे.कराची बंदरापासून ६०किमी लांब असलेल्या आयएनएस निर्घातला रडारच्या संपर्क झाला.आयएनएस निर्घातपासून हे टार्गेट ४० किमी लांब होते.ह्या टार्गेटची पुष्टी करण्यात आली सर्व भारतीय नौका यांच्यादरम्यान आपापसात संपर्क करून आयएनएस निर्घातला समोरच्या टार्गेटवर क्षेपणास्त्र सोडून हल्ला करण्याची आज्ञा मिळाली तसेच लगेच आयएनएस निर्घातने टार्गेट लॉक केले आणि मिसाईल लाँच केले आणि पहिल्याच मिसाईलने आपला टार्गेट यशस्वीरीत्या टिपला. आणि ते टार्गेट होते पीएनएस खैबर.

PNS Khybar
भारतीय युद्ध नौका ,कराची बंदर १९७१

पीएनएस खैबर हि पाकिस्तानची सर्वात शक्तिशाली लढाऊ वर्गातील विध्वंसक असे जहाज होते.हे जहाज भारतीय नौसेनेच्या आयएनएस निर्घातने रात्री १०:४५ वाजता एका क्षणात उध्वस्त करून टाकले.आयएनएस निपत आणि आयएनएस वीर हे उत्तरेकडे पुढे जात होते.पीएनएस मुहाफिझ हे अमेरिकन बनावटीची माईन स्वीपर क्लास जहाज होते.रात्री ११ वाजता आयएनएस निपतने पाकिस्तानच्या मालवाहू जहाज जे पाकिस्तानसाठी हत्यारे घेऊन जात जात होते ह्या जहाजावर क्षेपणास्त्र डागले,आणि त्यासोबत असणाऱ्या पीएनएस शाह जहाँ ह्या जहाजावरसुद्धा क्षेपणास्त्र डागले गेले आणि दोन्ही जहाजे उध्वस्त झाली.रात्री ११ वाजून २० मिनीटांनी आयएनएस वीरने पीएनएस मुहाफिझ ह्या जहाजावर हल्ला केला आणि अवघ्या पाच मिनटांमध्ये पीएनएस मुहाफिझ समुद्रात बुडाली.

पाकिस्तानी आणि भारतीय युद्ध नौका

याचदरम्यान आयएनएस निपत कराची बंदराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले आणि बंदरावर असलेले केमारी तेल साठवण्याच्या टाक्यांवर लक्ष्य केलं.कराची बंदरापासून २६ किमी लांब असलेल्या आयएनएस निपतने दोन क्षेपणास्त्र त्या तेल साठा असलेल्या टाक्यांवर सोडले एका क्षेपणास्त्र आपला वेध नाही साधता आला पण दुसऱ्या क्षेपणास्त्राने वेध साधला आणि बघता बघता संपूर्ण बंदराला आग लागली आणि काही मिनटांमध्येच संपूर्ण बंदर हे आगीच्या विळख्यात सापडले.परिणामी तेलाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी विमानेही उडू शकणार नव्हती.कराची बंदर आता धुराच्या काळोख्यात होरपळत होते.आणि ओखा भारतीय नाविक तळावर एक संदेश आला ‘अंगार’ म्हणजे मोहित फत्ते झाली.आता सर्व भारतीय नौका भारताच्या दिशेने परत चालल्या होत्या.

कराची बंदरावर हल्ला करताना भारतीय युद्ध नौका

         रॉने दिलेल्या उत्तम आणि खात्रीशीर माहितीमुळे भारतीय नौदलाला कराची बंदर उध्वस्त करण्यास मदत झाली. आणि ४ डिसेंबर १९७१ च्या मध्यरात्री भारतीय नौदलाने कराची बंदरावर हल्ला करून कराची बंदरावरील सर्व तेलाचे साठे,गॅस पाईपलाईन,वॉर शिप अँटी एअर क्राफ्ट प्रणाली,रडार सिस्टिम सर्वांच्या सर्व आग लावून सुफडा साफच करून टाकला.

टाइम्स ऑफ इंडिया ह्या वृत्तपत्रात आलेली बातमी
कराची बंदर आगीमध्ये खाक होताना

४ डिसेंबरला भारतीय नौदल कराचीमध्ये अक्षरशः दिवाळी साजरी करत होते.बरं हे झालं पाकिस्तानच्या पश्चिमेकडील क्षेत्राचं पूर्वेकडे पण भारतीय नौदलाचा डंका वाजत होता.पूर्वेकडे बंगालच्या खाडीत पाकिस्तानची समुद्री नाकाबंदी करून थांबला होता भारतीय नौदलाचा मनाचा तुरा आयएनएस विक्रांत.

बंगालच्या खाडीत भारतीय नौदलाचा मनाचा तुरा आयएनएस विक्रांत

आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक क्लास एअरक्राफ्ट कॅरियर होते ह्या जहाजावरुन भारतीय हवाई दलाचे विमाने थेट समुद्रातून आकाशाकडे झेप घेऊ शकत होती.आणि हे जहाज भारतीय नौदलाने बंगालच्या खाडी उतरवले आणि पूर्व पाकिस्तानमध्ये जाण्यासाठीचा समुद्री मार्गच बंद करून टाकला.

पाकिस्तानची हवाई आणि समुद्री कोंडी करताना भारतीय सशस्त्र सेना

भारतीय हवाई दलाने पहिले भारताच्या हद्दीमधून विमाने जाण्यास बंदी केली होती आणि आता समुद्री मार्गपण बंद करून टाकला आता पश्चिम पाकिस्तानमधून पूर्वी पाकिस्तानमध्ये रसद मदत पोहचवायची कशी ह्या विचाराने पाकिस्तानची डोकेदुखी झाली आणि मग त्यांनी अमेरिकेकडे भिका मागायला गेले आणि अमेरिका तर पहिल्यापासूनच पाकिस्तानच्या बाजूने होती झालं अमेरिकेने भारतावर दबाव टाकण्यास त्यांची एक जहाज बंगालच्या खाडीत उतरवले.मग भारताने रशियाकडे मदत मागितली अमेरिका आणि रशिया हे एकमेकांचे कट्टर शत्रू आणि १९६७ साली भारत रशिया मध्ये मैत्रीपूर्ण करार झाला होता कधी जर भारतावर कोणी चालून आले तर तुम्ही आम्हाला मदत करणार.ह्याच करारांतर्गत रशियाने पण एक जहाज समुद्रात उतरवले आणि अमेरिकन जहाजाला ब्लॉक करून टाकले.

अमेरिकेचे जहाज यूएसआरआर म्हणजेच आत्ताचं रशियाचे जहाज
रशिया अमेरिकेला इशारा दिलेला त्याबाबतची बातमी ट्रिब्युन ह्या वृत्तपत्रिकेने छापली

आता तर पाकिस्तानची पाक तंतरली.बंगालच्या खाडीत त्यांचा बाप आयएनएस विक्रांत हिमालयासारखा एकटा उभा होता.हीच नौदलीय नाकाबंदी तोडण्यासाठी पाकिस्तानने आपली सगळ्यात शक्तिशाली नाविन्यपूर्ण तंत्रज्ञांसह बनवलेली अमेरिकन बनावटीची पीएनएस गाझी हि पाणबुडी पाण्यात उतरवली ह्या पाणबुडीचे उद्देश्य हेच होते कि समुद्राखालून वळसा टाकून विशाखापट्टणमच्या हद्दीत जाऊन आयएनएस विक्रांतला पाण्या बुडवणे आणि भारतीय नौदलीय नाकाबंदी तोडून टाकून थेट पूर्व पाकिस्तानमध्ये जाणारा समुद्री मार्ग मोकळा करावा. पण झालं भलतंच पीएनएस गाझी ४ डिसेंबरच्या मध्यरात्री रहस्यमय परिस्थितीमध्ये बुडाली.ह्यात अनेक वाद आहेत कोण म्हणत आहे पीएनएस गाझीला आयएनएस राजपूतने उध्वस्त करून समुद्रात बुडवली तर पाकिस्तानचे म्हणणे आहे कि पाणबुडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाझी पाण्यात बुडाली.

पीएनएस गाझी

एवढा भयंकर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान हाय अलर्ट जारी केला.६ डिसेंबर १९७१ ह्या दिवशी सकाळी ६ वाजून ४५ मिनीटांनी पाकिस्तानच्या हवाई दलातील फॉकर ह्या लढाऊ विमानाने भारताचे लढाऊ जहाज समजून स्वतःच्याच पीएनएस झुल्फिकार ह्या जहाजावर हल्ला केला.एवढी दहशत पाकिस्तानच्या हवाई आणि नौदलामध्ये भारतीय नौदलाने निर्माण केली होती.
              ह्या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक नाविक मारले गेले,भारतीयांची एकही सैनिक आणि कोणताही अपघात झाला नाही.आणि हाच ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो,येत्या डिसेंबरला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत.

ऑपरेशन पायथॉन

     भारतीय सेनेने ऑपरेशन ट्रायडंट नंतर तीन दिवसांनी अजून एक मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला.आणि ती मोहीम होती ऑपरेशन पायथॉन ह्या मोहिमेचं नियोजन करण्याचे कारण हेच होते कि ऑपरेशन ट्रायडंट दरम्यान जेवढा विनाश कराची बंदराला होणे अपेक्षित होते तितके ते झाले नाही.कराची बंदराचा संपूर्णपणे सुफडा साफ करण्याच्या हेतूने ऑपरेशन पायथॉन ह्या मोहिमेची आखणी करण्यात आली.

      ९ डिसेंबर १९७१ च्या रात्री १०:०० वाजता एक भारतीय नौदलाचा एक लहान समूह चार क्षेपणास्त्रासह आयएनएस विनाश आणि बहुउद्देशीय फ्रिगेट आयएनएस तलवार आणि आयएनएस त्रिशूल हे मनोरा ह्या बेटाजवळ आले.पुढे जात असताना समुद्रात गस्त घालणारी पाकिस्तानचे एक जहाज दिसले.भारतीय नौकानी वेळ न दवडता त्या पाकिस्तानी जहाजाला उध्वस्त करून टाकले.

आयएनएस विनाश

कराची बंदरावर जात असताना आयएनएस त्रिशूलच्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलिअन्स आणि रडार मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते बंद पडले.काही वेळाने रात्री ११ वाजता कराची बंदरापासून १२ किमी लांब असताना काही जहाजे असल्याचे निदर्शनात आले.आयएनएस विनाशने आपल्या जवळ असलेली चारही क्षेपणास्त्र सोडली,पहिले क्षेपणास्त्र हे कराची बंदरात असलेल्या केमारी टॅंकच्या आत जाऊन फुटले आणि त्यामुळे एक धमाकेदार स्फोट झाला.दुसरे क्षेपणास्त्र पनामामियान इंधन टँकवर जाऊन फुटले आणि त्यालापण आग लागली.तिसरी आणि चौथ्या क्षेपणास्त्राने ब्रिटिश मालवाहू जहाजाच्या मागे लपून बसलेल्या पीएनएस ढाका ह्या पाकिस्तानी जहाजावर जाऊन फुटली आणि पीएनएस ढाकाचे दोन तुकडे झाले.

आयएनएस विनाशने आपल्या जवळील सर्व क्षेपणास्त्र सोडल्यामुळे भारतीय सर्व नौका परत भारताच्या किनारपट्टीवर जायला निघाल्या.आणि तेच वरून भारतीय हवाई दलाने लढाऊ विमानाने गोळ्यांचा मारा करत राहिले होते ते सर्व कराची बंदर बरबाद करून टाकले,आता फक्त तिथे धुराचा कल्लोळ दिसत होता.ऑपरेशन पायथॉन दरम्यान कराची बंदरावरील तेल आणि दारूगोळाचे सर्व साठे,कोठारे,वखारी,वर्कशॉप सर्वांच्या सर्व उध्वस्त करून टाकले.ह्या दोन ऑपरेशन मध्ये पाकिस्तानचे तीन अब्ज डॉलरचे नुकसान झाले आणि पाकिस्तानचे आर्थिक कंबरडेच मोडले.ज्यातून ते अजूनही सावरे शकले नाहीत.कराची बंदरावरील आग हि ७० किमीपेक्षाही अधिक दुरून दिसत होती,हि आग वीजवायला पाकिस्तानला पाच ते सात दिवस गेले.अशा प्रकारे भारतीय नौसेना आणि भारतीय हवाई सेनेने पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी केली.

ऑपरेशन ट्रायडंट आणि ऑपरेशन पायथॉन कराची बंदर जळून खाक, डिसेंबर १९७१

पुढील भागात भारतीय सेनेचा शेवटचा वार आणि पाकिस्तानचे दोन तुकडे…बांगलादेश स्वतंत्र…….

७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
जय हिंद…..

References :

Indian  Navy

Indian Air Force

Indian Army

Ministry Of Defense

भारतीय गुप्तचरसंस्थेची गुढगाथा

Mission R&AW –RK Yadav

Times of India

Tribune

अभि

Featured

भारत पाक युद्ध १९७१ : पार्श्वभूमी

India-Pakistan War 1971

काही तासांपूर्वी पाकिस्तानी हवाई जहाजांनी भारताच्या अमृतसर,पठाणकोट,श्रीनगर,अवंतीपुर,उत्तरलई,जोधपूर,अंबाला आणि आग्रा मधील भारतीय हवाई अड्ड्यांवर बॉम्ब फेकले आहे,मला जरा पण संकोच नाही कि विजय हा भारतातील जनतेचा आणि भारतीय शूर सैन्याचा होईल.

पंतप्रधान इंदिरा गांधी

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑल इंडिया रेडिओ वरून ३ डिसेंबर १९७१ रोजी भारतीयांच्या नवे संदेश दिला.भारत पाकिस्तान १९७१ लढाईला सुरवात झाली होती आणि ती सुरवात पाकिस्तानने बॉम्ब हल्ल्याने केली पण भारत पहिल्यापासून लढाईसाठी तयार होता.अगदी २ वर्षांपासून…
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी होऊन पाकिस्तान ह्या नव्या देशाची निर्मिती करण्यात आली फाळणीमध्ये पाकिस्तानला सिंध,पंजाब आणि बंगाल हे प्रांत देण्यात आले.अशी विचित्र फाळणी तेव्हा जगाच्या इतिहासावर प्रथमच झाली असेल.तेव्हा पाकिस्तान हा दोन प्रांतांमध्ये होता एक म्हणजे आत्ताचा जो पाकिस्तान आहे तो पश्चिम पाकिस्तान आणि आत्ता जो बांगलादेश आहे तो पूर्वी पाकिस्तान तेव्हा बांगलादेश हा देश जन्माला आला नव्हता.पाकिस्तान हे काही लोकशाहीवर चालणारे राष्ट्र नाही आजही नाही आजही हा फक्त आणि फक्त त्यांच्या सैन्याच्या इशाऱ्यावरच चालतो.

15 August 1947 Map

१९४७ सालापासून पाकिस्तान मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली नव्हती पण १९६९ साली तत्कालीन पाकिस्तानचे जनरल याह्या खान हे पाकिस्तानचे राष्ट्रपती झाली निवडणूक न लढवता त्यांनी घोषित केले कि १९७० साली सार्वत्रिक निवडणूक घेतली जाईल तोपर्यंत भारताच्या ४ निवडणूक झाल्या होत्या आणि पाचव्या निवडणुकीसाठी तयार होत होता.
 १९७० निवडणुका पार पडल्या आणि निकाल आला,पूर्वी पाकिस्तानच्या शेख मुजिबूर रहमान यांच्या आवामी लीगला १६२ पैकी १६० जागेवर विजय मिळाला तर आणि ७ जागा महिला राखीव गटातून लढवल्या होत्या त्या सातही जागेवर विजय मिळाला असे एकूण १६९ जागी निवडणूक लढवून १६७ जागेवर विजय मिळवण्याचा हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे.आणि पाकिस्तानमधील सर्वात मोठी पार्टी असणाऱ्या झुल्फिकार अली भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला फक्त ८५ जागेवर विजय नोंदवता आला.पाहायला गेलं तर आवामी लीगला स्पष्ट बहुमत होते ह्यानुसार ते पाकिस्तानचे पंतप्रधान होणे अपेक्षित होते आणि पश्चिम पाकिस्तानला म्हणजे आत्ताच्या पाकिस्तानला ते मान्य नव्हते ह्यामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये जनक्रोष उफाळला.

पक्षअवामी लीगपीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तान
नेताशेख मुजिबूर रहमानझुल्फिकार अली भुट्टो
जिंकलेल्या जागा१६०+७८१+५
लोकप्रिय मत१२,९३७,१६२६,१४८,९२३
टक्केवारी३९.%१८.%
1970 Pakistan General Election Result

पाकिस्तानने पूर्वी पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवले आणि मुजिबूर रहमान ह्यांना घरातून अटक केली आणि पाकिस्तानमध्ये तुरुंगात डांबले.ह्यामुळे पूर्वी पाकिस्तानमध्ये दंगली सुरु झाल्या जाळपोळ कत्तली सुरु झाल्या.हे सर्व भारत पाहत होता पण भारतापुढे पहिले अंतर्गत वाद होते, भारताच्या नागालँड आणि जवळच्या राज्यात वांशिक संघर्ष पेटला होता.आज आसाम मिझोराम ह्या राज्यात जो वाद चालू आहे तोच वाद तेव्हाही चालू होता.पण जेव्हा पूर्वी पाकिस्तानमध्ये यादवी युद्ध म्हणजे सिविल वॉर चालू होते तेव्हा पूर्वी पाकिस्तानमधून लाखोंच्या संख्येनें लोक भारतामध्ये आश्रयाला येत होते त्यासाठी आश्रयस्थान बांधण्यात आले होते.निर्वासितांची संख्या वाढतच चालली होती त्यामुळे भारताला आता हस्तक्षेप करणे भागच होते,त्यात पाकिस्तान हे पूर्वी पाकिस्तानमध्ये उर्दू हीच राष्ट्रभाषा असेल हा प्रस्ताव पारित केला होता.अशी अनेक करणे आहेत ज्यासाठी बांगला जनता हि आक्रोश करत होती.

Awami League Election Rally 1970

२५ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानने मार्शल लॉ लादला,मार्शल लॉ म्हणजे देशाच्या एखाद्या प्रांतात शासकीय यंत्रणा आणि कायदा यांचे पालन होत नाही किंव्हा ते करण्यात सरकार कुचकामी पडते तेच सैन्याद्वारा मार्शल लॉ लावण्यात येतो ह्यामुळे सरकारचे नियंत्रण संपते आणि तो प्रांत संपूर्णपणे सैन्याच्याखाली येतो आणि सर्व अधिकार आणि हक्क हे सैन्याकडे येतात.२५ मार्च १९७१ ला पूर्वी पाकिस्तान मध्ये मार्शल लॉ लागला आणि लगेच आवामी लीगचे मुजिबूर रहमान याना अटक करण्यात आली आणि सैन्याद्वारा ऑपेरेशन सर्चलाईट सुरु करण्यात आले.परदेशी पत्रकारांना हाकलण्यात आले आवामी लीगवर बंदी घालण्यात आली.पूर्व बंगाल रेजिमेंटच्या सैनिकांना मारण्यात येत होते पूर्व बंगालच्या पलटणमधील पूर्व पाकिस्तान रायफल्स ह्यातील काही सैनिकांनी मुक्ती वाहिनी(मुक्ती बाहिनी)ची स्थापना केली.मुक्ती वाहिनी म्हणजे स्वतंत्र सैनिकांची चळवळ.

Newspaper of United Kingdom


२५ मार्च १९७१ साली पाकिस्तान सैन्याच्या काफिल्याने ढाका विद्यापीठामध्ये टँक्स घुसवले प्रत्येक सैनिकांकडे ऑटोमॅटिक रायफल्स,रॉकेट लाँन्चर होते.पाकिस्तानचे सैन्य जो भेटेल त्याला मारत सुटले होते मुलं-मुली,शिक्षक ढाका विद्यापीठात मृत्यूचे तांडव चालू होते.ह्यात ३००-४०० विध्यार्थी मृत्युमुखी पडले होते.
२७ मार्च १९७१ रोजी मेजर झीयावर रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशचा नारा दिला आणि तिथूनच पाकिस्तान आणि पूर्वी पाकिस्तानचा वाद चिघळला.आणि बांगला सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य ह्यांच्या गनिमी कावा म्हणजे गोरिला वॉर सुरु झाले,ह्यात अनेक सैनिक मारले गेले.ढाका हा पाकिस्तानचा गढ बनला होता.रस्त्यांवर रक्ताचे सडे पडले होते.सगळीकडे जाळपोळ अराजकता माजली होती मानवताहीन कृत्य घडत होते.अनेक स्त्रियांचे घरात त्यांच्याच नातेवाइकांसमोर तर काहींना रस्त्यावर आणून त्यांच्यावर बलात्कार होत होते आहे सर्व उघडपणे घडत होते अल्पसंख्याक सणाऱ्या हिंदू स्त्रियांना तर शोधून शोधून सामूहिक बलात्कार करण्याचा कार्यक्रमच चालला होता.

The Times Newspaper, United Kingdom


हा नरसंहार पाकिस्तानचे राष्ट्रपती याह्या खान यांच्या सांगण्यावरून पूर्व पाकिस्तान ईस्टर्न कमांडचे चीफ जनरल टिक्का खान यांच्या देखरेखीखाली चालला होता त्यावेळेस जनरल टिक्का खान यांनी एका रात्रीत ७००० लोकांच्या कत्तली केल्या,आणि नरसंहार ९ महिने चालू आहे ह्या ९ महिन्यात पाकिस्तान सैन्याने २ लाखाच्या वर महिलांचे मुलींचे बलात्कार केले काहींना कॅम्पमध्ये ठेऊन रोज त्यांच्यावर बलात्कार केले जात.लहान लहान मुली ज्यांचे वय फक्त १२,१३ वर्षे होते त्यांच्यावर रोज रात्री एका मुलीवर कमीतकमी ५ पासून ५० जवानांद्वारे बलात्कार होत होता.

मला माझ्या घरातून पाकिस्तानी सैन्याकडून अपहरण करण्यात आले आणि मला सैन्याच्या बरॅकमध्ये ३ महिने ठेवण्यात आले होते,अनेक रात्री ३० सैनिक माझ्यावर बलात्कार करत होते.

१४ वर्षांची पीडित ७ महिन्याची पाकिस्तानी सैन्याकडून गर्भवती

लहान मुले अगदी १,२ वर्षांच्या मुलांनासुद्धा मारून टाकत होते.पाकिस्तानी सैन्य इतक्यावरच थांबले नव्हते त्यांनी लोकांचे हाल करण्यासाठी टॉर्चर रूम तयार केल्या होत्या.रंगपूर येथे त्यांनी एक शासकीय कामात वापरात असलेल्या इमारत ताब्यात घेतली तेथील सर्व घडणारे उपक्रम,नाटक,सांस्कृतिक उपक्रम बंद करून टाकले सर्व इमारत ताब्यात घेऊन तिथे लष्करी तळ ठोकला.त्या इमारतीमध्ये अनेक टॉर्चर खोल्या तयार केल्या तिथे सामान्य लोकांना चौकशीच्या नावाखाली घेऊन येत आणि त्यांच्यावर अत्त्याचार केला जात.डोळ्यात ऍसिड टाकून त्यांना गोळ्या मारत होते तर कोणी अंगावरील कातडं निघेपर्यंत मारत होते.त्या इमारतीमध्ये एक सभागृह होते तेथील सर्व खुर्च्या काढून खाली फळ्या टाकण्यात आल्या होत्या आणि भिंतींना हुक ठोकण्यात आली आणि त्या हुकांवर स्त्रियांना अडकवले जात जेणेकरून ते पळून जाऊ नाही शकत.ह्याच सभागृहात सर्व स्त्रियांना पकडून आणले जात आणि त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून टाकले जात आणि बलात्कार केले जात अनेक महिलांनी मुलींनी तिथून पळून जाऊन बाहेरील विहिरीमध्ये उद्या घेऊन स्वतःला संपवले होते.

हिटलर जर कोणाचा क्रमांक लावायचा असेल तर तो जनरल टिक्का खान ह्या निर्दयी जनावराचा लागला पाहिजे.हा सर्व प्रकार घडत असताना तेथून हजारोच्या संख्येने लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयासाठी येत होते,आश्रितांची संख्या वाढतच चालली होती आणि दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याचा नरसंहार चालूच होता आणि ह्याच वेळेस त्यांची नजर काश्मिरसुद्धा होती.

Bangaladesh Genocide 1971

ह्याबद्दलच्या अनेक खबऱ्या ह्या भारताच्या रिसर्च एंड एनालिसिस विंग म्हणजेच रॉ या संघटनेमार्फत येत होती.पाकिस्तान सैन्याने ३० लाखाच्यावर लोकांना मारून टाकले होते तर ३ लाखाच्यावर महिला मुलींवर बलात्कार केलेलं होते. २५ एप्रिल १९७१ भारतामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली.पूर्वी पाकिस्तान मध्ये घडत असलेल्या हत्याकांडाबद्दल सर्वाना माहिती देण्यात आली आणि भारताचे पुढील पाऊल काय असेल ह्यासंदर्भात चर्चा झाली.तेव्हाचे भारतीय लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ यांच्यासोबत ताटकलाईन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्वी पाकिस्तानबद्दल एक बैठक झाली ह्या बैठकीमध्ये इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशॉ यांना पूर्वी पाकिस्तान मध्ये लवकरात लवकर सैन्य पाठ्वण्याबद्दलचे मत विचारले त्यावर त्यांनी उत्तर दिले

“मॉन्सून काही दिवसातच येईल आणि जर पाऊस आला तर ढाकाच्या आजूबाजूला नद्या आहेत पाऊस जोरात आला तर ह्या नद्या समुद्रासकरख्या वाहू लागतात,त्यात तिथे दलदलीचा भाग जास्त आहे.तुम्ही जर एका तटावर उभे राहिलात तर तुम्हाला समोर काय चालले आहे काहीच दिसणार नाही.माझ्या सर्व हालचाली ह्या रस्त्यानेच कराव्या लागतात आणि जरी माझे सैनिक तिथे गेले आणि मला हवाई दलाची गरज भासली तर बदलत्या हवामान परिस्थितीमुळे हवाई दल मला मदत करू शकणार नाही.आणि तरी आत घुसलो तर मी तुम्हाला १०० टक्के खात्री देतो आपण हे युद्ध हारु.”

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ
Field Marshal Sam Manekshaw With Prime Minister Indira Gandhi


भारताचे लष्करी दल हे युद्धापासून स्वतःला बचाव करता यावा ह्या दृष्टिकोनातून तयार केले गेले होते आक्रमनासाठी नाही.तुम्हाला किती वेळ पाहिजे तयारी करण्यासाठी असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशॉ यांना विचारले त्यावर ते म्हणाले ६ महिने,मला ६ महिने द्या तयारीसाठी.आणि इंदिरा गांधी यांनी ६ महिने युद्ध तयारीसाठी दिले.आणि सुरु झाले पाकिस्तानला आणि ह्या जगाला संदेश देण्याचा भारत हा देश शांतीप्रिय देश पण जर आमच्या तुम्ही युद्ध लादण्याचा प्रयत्न केला अथवा भारत देशाच्या सार्वभौमत्वला धक्का लावण्याचा प्रयत्न केलात तर भारत आपली सर्व शक्ती दाखवेल.

पुढच्या भागात ऑपरेशन ट्राइडेंट….

-अभि

References

Bangladesh Government Library

Indian Army

The New York Times

The Daily Telegraph

Wikipedia

Featured

आरक्षण : समज गैरसमज

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आरक्षण! भारतामध्ये सगळ्यात जास्त अफवा पसरवल्या असतील त्या आरक्षणाबद्दल अनेकांच्या मनात राग भरला गेला आहे,अनेक वर्ष ह्या आरक्षणावर सगळ्यात मोठी अफवा असेल ती म्हंणजे आरक्षामुळे ह्या देशाचं नुकसान झालं आहे,आरक्षणामुळे हा देश अनेक शतके मागे गेला आहे,.अश्या अनेक थापा लोकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. अनेकांना आरक्षण म्हणजे काय हेच नक्की माहित नाही, ह्यांना काय ३५% जरी भेटले तर त्यांना प्रवेश भेटतो कॉलेजला पण असं नाही काही तेच आपण पाहू सगळ्यात पहिले हे कळलं पाहिजे की आरक्षण म्हणजे नक्की काय आहे? ते का आहे?

हिंदू नावाची सभ्यता ह्या देशात हजारो वर्षे जुनी आहे इंडस वेली म्हणजे आत्ताच आपला हडप्पा आणि मोहेंजो दारो येथे राहणारी लोक म्हणजे हिंदू होय.हिंदू धर्मशाश्त्रानुसार लोकांना वर्ण आणि जातींमध्ये विभागले गेले ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,शूद्र.

ब्राह्मणांना सर्व शाश्त्र शिकण्याचा,सर्व निर्णय करण्याचा अधिकार होता तर क्षत्रिय यांना राजा आणि लढण्याचा अधिकार होता वैश्य यांना शेती,व्यापार करण्याचा अधिकार होता आणि शूद्र अस्पृश्य किव्हा अस्पृश्य म्हणजे ज्याला दुसऱ्या व्यक्तीने स्पर्श करू नये त्याला हीन  दर्जाची वागनुक दिली जाते. यांना कोणताच अधिकार नव्हता.वरील सर्वांची सेवा करणे हाच त्यांचा धर्म होता.अश्या प्रकारे भारतात वर्ण व्यवस्थेला सुरवात झाली,जी पूर्णपणे शूद्र यांच्या श्रमांवर आधारित होती.सुरवातीला शूद्र हे ह्या एकाच समाजाचा घटक होते जसजसे समाज विकसित होत गेला तसतसे शूद्रांना समाजातून वेगळं करण्यात आले त्यांच्यावर बंधने घालण्यात आली आणि मग अत्त्याचार करण्यात आले.जनावरांना माणसासारखे वागणूक मिळत होती तर शुद्रांना जनावरांपेक्षाही बत्तर वागणूक मिळत होती.

शूद्र म्हणजे घाण होती समाजाची शिक्षण,व्यवहार यांवर बंदी,सैन्यात प्रवेश नाही,इतकच काय तर पाण्याचे स्रोत सुद्धा वेगळे,मंदिरात प्रवेश नाही,चांगले जेवण,रहायला चांगली जागा,आरोग्य सुविधा नाही,शेती नाही कि जमीन नाही फक्त श्रम आणि समाजाची घाण साफ करणे,शूद्रांची सावली जरी पडली तरी धर्म बाटत होता. शूद्रांना कोणतेही द्रव्य म्हणजे सोने चांदी आदी ठेवण्याचा सुद्धा अधिकार नव्हता.शूद्र ह्या अश्या असंख्य यातना वर्षानुवर्षे सहन करत आला होता. एकेकाळी कष्ट करून पोट भरणारा वर्ग हा मेलेल्या जनावरांची मढी वाहू लागला.रोजच्या पोटापाण्यासाठी दारोदार भटकू लागला,स्त्रियांवर लैंगिक अत्त्याचार,छळ ह्यांची तर त्यांना आता सवयच झाली होती.माणसाच्या गळ्यात मडकी बांधून मागे झाडू बांधण्यात कसली आली समानता.राजे महाराजे नंतर मुघल मग फिरंगी अनेक साम्राज्य उदयाला आले आणि अस्तास गेले,पण शूद्र मात्र तिथेच खितपत पडले होते.इंग्रजांच्या काळात थोडी मुभा शूद्रांना मिळाली अनेक पुरोगामी विचारसरणी असलेले समाजसेवक ह्या देशाला लाभले हे ह्या देशाचे भाग्यच म्हणावे लागेल.हळू हळू शूद्र सैन्यात भरती होऊ लागले,काही शिक्षण घेऊ लागले पण समाजातून तीव्र विरोध हा चालूच होता.आणि इथून चालू झाला लढा आरक्षणाचा.

महात्मा जोतिबा फुले आणि सत्यशोधक समाज

भट ब्राह्मणांच्याद्वारे अस्पृश्य शूद्र समाजाला अत्याचारापासून वाचवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.त्याकाळी अस्पृश्य समाज या पूर्णतः गलामगिरीमध्ये जगत होता जाचक कर,छळ,देवदेवतांच्या नावाने अमानुष अत्याचार केले जात.सत्यशोधक  समाज हा लोकांमध्ये समानतेची भावना जागरूक करण्याचे काम करत होता तसेच सर्वाना शिक्षण घेण्याचा सामान अधिकार आहे ह्यात जात पात स्त्री पुरुष सर्वाना सामान अधिकार आहेत.ज्या काळात स्त्रिया फक्त चूल आणि मूल इथपर्यंत त्यांच्या जीवनाचा धागा होता पण त्यांनी स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई याना शकवून शिक्षित करून एकप्रकारची क्रांतीच जन्माला घातली,पुढे ह्याच भट ब्राम्हणांनी कश्याप्रकारे त्यांना त्रास दिला हे आपल्याला माहिती. शूद्र लोकांनासुद्धा शिक्षण घेण्याचा अधिकार आहे त्यांनासुद्धा स्वाभिमानाने जाण्याचा हक्क आहे हे त्यानं सर्व माणसात पटवून दिले.

ब्रिटिश भारतात चार्ल्स वूड यांच्या शैक्षिणक योजनेनुसार शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याचा प्रयत्न केला होता.ह्या योजनेची अंबलबजावणी कशी होत आहे आणि अजून काय काय सुधारणा शैक्षणिक धोरणात करता येतील यासाठी भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड रिपन यांनी सर विल्यम हंटर एका आयोगाची स्थापना १८८२ साली केली.महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर आयोगाला सविस्तर असं निवेदन अथवा सूचना दिल्या होत्या.त्यात त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सक्तीचे आणि विनामूल्य प्राथमिक शिक्षण देण्याचे तसेच तत्कालीन सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्य आणि मागास जातींसाठी योग्य जागा राखीव म्हणजेच आरक्षित करून ठेवण्याबाबत सूचना केल्या होत्या. ह्यालाच भारतीय शिक्षण आयोग अथवा हंटर आयोग म्हणून संबोधले जाते.

राजश्री शाहू महाराज छत्रपती आणि वेदोक्त प्रकरण

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज (कोल्हापूर गादी) राजश्री शाहू महाराज यांचे वेदोक्त प्रकरण हीच आरक्षणाची नंदी म्हणता येईल.सन १८९९ ऑक्टोबर  मध्ये राजे आपल्या परिवारासह कार्तिक स्नानासाठी पंचगंगा या नदीच्या तीरावर गेले होते सोबत राजारामशाश्त्रि भागवत आणि मंत्र उच्चारण्यासाठी नारायण भटजी हे सुद्धा होते.भटजी मंत्र उच्चारात असताना भागवत यांचे लक्ष त्या भटजी आणि मंत्रांवर गेले.नारायण भटजी हा स्वतः स्नान न करताच वेदोक्त ऐवजी पुराणोक्त मंत्र उच्चारात होता.छत्रपती हे वेदोक्त मंत्रांचे अधिकारी असतात आणि स्नान करून येणे आवश्यक असते.हे सर्व  राजारामशाश्त्रि भागवत यांनी राजेंना निदर्शनास आणून दिले आणि राजेंनी भटजी कडे याबद्दलचे उत्तर मागितले. त्यावर भटजीने असे उत्तर दिले,’शूद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात.वैदिक मंत्रांसाठी स्नानाची आवश्यकता असते परंतु या शूद्रांना पुराणोक्त पद्धतीचा अनुग्रह करावयाचा असल्याने मला स्नानाची आवश्यकता नाही!’ हे उत्तर राजेंना अवमानकारक वाटले जर आपली हि अशी अवस्था होत आहे तर सामान्य लोकांचे काय होत असेल आणि हाच क्षण हाच प्रसंग राजश्री शाहू महाराजांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देणारा ठरला.

hmk

ह्या वेदोक्त प्रकारानंतर १९०२ साली त्यांनी कुलकर्णी जे शेतकऱ्याकडून जबरदस्तीने अधिक कर वसूल करत होते ती प्रथा बंद करून त्यांनी स्वतःच्या राज्यात लेखापाल म्हणजे अकाउंटंट ठेवले.तसेच राज्यकोषातून कोणत्याच ब्राह्मणाला कोणताही उपहार दिला जाणार नाही.तसेच आपल्या राज्यातील सरकारी कार्यालय मध्ये कुठल्या जातीचे आणि किती कामगार काम करत आहेत ह्याबद्दलचा तपशील मागवला असता त्यांना त्यात ७१ उच्छपदांवर ६० ब्राम्हण तर ११ गैर ब्राम्हण होते गैर ब्राह्मणात अँग्लो-इंडियन,युरोपियन,पारसी येत.तसेच निजी सेवेसाठी असलेल्यांमध्ये ५२ मधले ४५ अधिकारी हे ब्राम्हण होते. मराठा साम्राज्यचे नेतृत्व करत असलेल्या राज्यात मात्र मराठा ह्याच जातीचा एकही अधिकारी सेवेत नव्हता. इथे कुठेही शूद्र प्रवर्गातले लोक नव्हते.कारण त्यांना हजारो वर्षांपासून शिक्षणच घेण्यापासून वंचित ठवेल गेले होते. २६ जुलै १९०२ साली एक जाहीरनामा काढला तो असा राज्यात सर्व सरकारी ठिकाणी ५०% आरक्षण म्हणजे ब्राम्हण पारसी व्यतिरिक्त सर्वाना नोकरी किंवा सेवेमध्ये घेतले जाईल,५०% मागासवर्गीय मध्ये ब्राम्हण,शेणवी,पारशी,प्रभू ह्या जातींव्यतिरिक्त सर्व मासवर्गीय जाती म्हणजे मराठे,कुनभी,माळी,कुंभार,चांभार सर्व जाती. आणि २८ जुलै १९०२ साली अजून एक जाहीरनामा काढण्यात आला त्यात राज्यातील सर्व खाजगी कार्यालयामध्ये ५०% जागा मागासवर्गीय जातींसाठी राखीव म्हणजेच आरक्षित करण्यात आल्या. तसेच शाहू महाराजांचा राज्याभिषेक होण्याआधी अस्पृश्याना कोणत्याही रुग्णालयात भरती करून घेता येत नव्हते,हे मोडून त्यानी सर्व शूद्र अस्पृश्य लोकांना रुग्णालयात उपचार करून घेण्याचे आदेश काढले आणि जरी कोणी ह्या आदेशाचे पालन नाही केले त्यांना लगेच कामावरून बडतर्फ करण्यात येईल.खालील स्तरांवरील सर्व लोकांना शिक्षण दिले जाईल त्यासाठी शाळांची स्थापना करण्यात आली.तसेच मुस्लिम समाजसुद्धा शिक्षित करण्यासाठी त्यांनी समिती स्थापन केली.राजश्री शाहू महाराज यांनी एकाप्रकारे अस्पृश्य निर्मूलनाच्या कार्याचा वासाच घेतला आणि हे कार्य पुर्णत्वाससुद्धा नेले. हे क्रांतिकारी बदल घडत होते तेव्हा विरोधही तितकाच होता, आरक्षण ह्या Affirmative Action ला लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले,महादेव गोविन्द रानडे यांनी विरोध केला होता.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण

मी असेपर्यंत आरक्षण राज्यघटनेतून मी हटवणार नाही,तुम्ही कितीही जोर लावा…नाहीतर मीच राजीनामा देतो ड्राफ्टींग कमिटीमधून मग तुम्हाला पाहिजे तसं संविधान बनवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एकीकडे भारताला जुलमी इंग्रज साम्राज्यवादापासून कशाला स्वतंत्र करण्याच्या बाजूने लढा लढला जात होता तर दुसऱ्या बाजूला हजारो वर्षांपासून जाती-उपजातींमध्ये अडकलेला देशातील शूद्र अस्पृश्य लोकांना ह्या जातीपातीच्या बेडीतुन मुक्त करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे लढत होते.राजश्री शाहू महाराज छत्रपती यांचे सहकार्य बाबासाहेबाना पावलोपावली लाभत राहिले किंबहुना राजेंचा खूप मोठा प्रभाव बाबासाहेबांवर पडला होता.दोघांचेहि अंतिम उद्दिष्ट हे अस्पृश्यता संपवण्यावर होता.जेव्हा भारताची घटना तयार करण्यासाठीचा विचार होत होता तेव्हा भारताची राज्यघटना हि एका वंचित शोषित आणि अस्पृश्याने तयार करावी असे महात्मा गांधी यांचे मत होते तसं पहायला गेल तर दोघांचे मतप्रवाह हे फार भिन्न होते.

बाबासाहेब यांना वंचित शोषित लोकांना आरक्षण तर देयचे होते पण ह्या भारताची समता बंधुता आणि अखंडता ह्याला कुठेहि तडा जाऊ देयचा नव्हता.त्यांचे म्हणणे होते कि आपण सर्व प्रथमतः आणि अंतः भारतीय आहोत.सामाजिक मागासलेले जाती उपजाती यांचे सबळ आणि सक्षम म्हणजे उच्च जातीतील लोकांपासून रक्षण करण्यासाठी आरक्षण ही संकल्पना आणली गेली.त्याला विरोधहि अगदी पाहल्यादिवसापासून झाला पण हेही सर्वज्ञात होते कि हजारो वर्षांपासून चालत आलेली वर्ण व्यवस्था अशी काही लगेच संपणार नाही किंबहुना शूद्र अस्पृश्यांवर अत्त्याचार अजून वाढत राहतील ह्यावर तोडगा काढणे तर गरजेचे होते जिथे लोकांना लोकांद्वारे पाणी सुद्धा पिऊ दिले जात नव्हते,ज्यांची सावली जरी पडली तरी लोकांचे धर्म बुडत होते देव बाटत होते त्या वंचित समाजाला ह्या सर्व अन्यायातून बाहेर तरी कसे काढायचे त्यासाठी आरक्षण हाच एकमात्र पर्याय होता.घटना समितीच्या चर्चेदरम्यान वंचित शोषित समाज जो शूद्र अस्पृश्य आहे त्याला सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आरक्षण देण्याचे ठरले.त्यावेळी साक्षरतेचे आणि जातीय जनगणनेचे निकष तपासले गेले आणि एससी म्हणजे शेड्युल कास्ट अनुसूचित जाती या समाजाला १५ टक्के, एसटी म्हणजेच शेड्युल ट्राईब अनुसूचित जमाती यांना ७.५ टक्के असे २२.५ टक्के आरक्षण देऊ केले. १९५१ च्या जनगणनेनुसार देशात अनुसूचित जाती यांची लोकसंख्या हि एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के इतकी होती तर अनुसूचित जमाती यांची संख्या ६.३१ इतकी होती त्यानुसारच आरक्षणाची टक्केवारी ठरवण्यात आली. धर्म, जात, लिंग, जन्म ठिकाण, वंश आधारीत भेदभाव नाकारताना सर्वांना विकासासाठी समान संधी आणि जाती व्यवस्थेला बळी पडल्या समजला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून आरक्षणाची निर्मिती झाली. इतर मागासवर्गीय जाती यासाठीचे २७ टक्के आरक्षण हे १९९२ साली मंडळ आयोगाच्या शिफारशींवर देण्यात आले आहे.

“सबल व दुर्बल या दोघांचेही चुकत आले आहे. सबल दुर्बलांचे अस्तित्वच मान्य करीत नाही, तर दुर्बल स्वत:ला दुर्बलच ठेवून, त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न वा प्रतिकार करीत नाही. म्हणजेच जेव्हा दोघेही आपापल्या भूमिकेतून बाहेर येतील तेव्हा खऱ्या अर्थाने समता निर्माण होईल. म्हणजेच आरक्षणाचा विषयदेखील हळूहळू माघारेल.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वरील दिलेल्या आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक असून त्याला कोणत्याही वर्षांची मर्यादा नाही,राजकीय आरक्षण हे १० वर्षांसाठी देऊ केले होते पण बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय आरक्षण हे जास्त काळासाठी देऊ करायचे होते कारण हजारो वर्षे वर्ण व्यवस्थेमध्ये अडकलेला समाज असा लगेच पाच दहा वर्षात सुधारणार नाही हे त्यांना माहित होते.पण सभागृहाने १० वर्षे राजकीय आरक्षण देण्याच्या मुदतीचा विचार केला पण पण बाबासाहेब यांनी जर दहा वर्षात अनुसूचित जाती जमाती यांची पुरेशी प्रगती झाली तर मात्र हि मुदत वाढवली जाईल अशी तरतूद संविधानात करून ठेवलेली आहे.आणि अजूनही हि मुदत वाढवली जात आहे ह्याचा काय अर्थ होतो हे तुम्हाला एव्हाना समजलेच असेल.राज्यसभा आणि विधान परिषदेत मात्र राजकीय आरक्षण नाही.

मंडल आयोग

१९७७ रोजी मोरारजी देसाई हे जनता पक्षाकडून भारताचे पंतप्रधान झाले.मोरारजी देसाई यांच्या सरकारने सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर मागास राहिलेल्या जाती जमाती यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्याबद्दलचा सखोल अभ्यास करण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक मागास स्तर आयोगाची स्थापना १ जानेवारी १९७९साली केली,आणि ह्या आयोगाची सर्व धुरा तत्कालीन खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्यावर सोपवण्यात आली.पुढे जाऊन ह्याच आयोगाला मंडल अयोग्य अथवा मंडल कमिशन म्हणून संबोधले जाऊ लागले.मंडल आयोगाने सामाजिक आणि आर्थिक मागास कोण हे ठरवण्यासाठी ११ मापदंड लावले आणि त्यानुसारच डिसेंबर १९८० साली आपला अहवाल सादर केला या अहवालात इतर मागासवर्गीय जातींसाठी म्हणजेच अनुसूचित जाती जमाती वगळता ज्या इतर मागासवर्गीय जाती आहेत त्यांच्यासाठी २७ टक्के इतके आरक्षण द्यावे हि शिफारस केली.त्यानंतर जनता सरकार कोसळलं.आणि मग इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं सरकार आलं पण त्यांनी इतर मागासवर्गीय जाती म्हणजे ओबीसी आरक्षणापासून स्वतःला लांबच ठेवणे पसंद केले ते १९९० सालापर्यंत.आणि मग ७ ऑगस्ट १९९० साली तत्कालीन पंतप्रधान वी. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींना मान्यता दिली.आणि मग भारतभर संप,मोर्चे,निदर्शने,आंदोलने होयला सुरवात झाली तर काही ठिकाणे दंगली उसळल्या.प्रकरण थेट न्यायालयात गेले आणि १६ नोव्हेंबर १९९२ साली सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोगातील शिफारशींना योग्य ठरवून आरक्षणाची जास्तीस जास्त मर्यादा हि ५० टक्के लावून ऐतिहासिक निर्णयाचे नऊ न्यायाधीशांच्या बेंचने सुनावला,आणि केंद्र सरकाने इतर मागासवर्गीयांना २७% आरक्षण देण्याची अधिसुचना जाहिर केली.

आरक्षण ५०% मर्यादा

१९९१ साली पत्रकार इंद्रा सोहनी या  मंडल आयोगाच्या २७% आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या.जर अनुसूचित जाती यांना २२% आणि ओबीसी या समाजाला २७% आरक्षण दिल्यास समानतेच्या अधिकाराचे काय होणार आणि मागासवर्गीयचा स्तर ठरवण्यासाठी जात हे योग्य मापदंड नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने जात हेच सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण असण्याचे प्रमुख कारण आहे असे मान्य केलं.आणि मंडल आयोगाच्या शिफारसी ह्या वैध्य ठरवल्या गेल्या.सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण तर देऊ केले पण त्यात एक क्रिमी लेयरचे निकष घालण्यात आले म्हणजे १९९३ साली ज्यांचे उत्पन्न हे एक लाखाच्या खाली असेल त्यांनाच ह्या २७ टक्के आरक्षणाचा लाभ घेता येईल.पुढे २००३ साली उत्पन्नाचे निकष अडीच लाखांवर आणले आणि २०१३ साली सहा लाखांवर आणले म्हणजे ज्यांचे उत्पन्न हे सलग ३ वर्षे ६ लाखाच्या वर असेल त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही कारण ते आता आर्थिकदृष्ट्या पुढे गेले आहेत.२२.५० टक्के आरक्षण हे अनुसूचित जाती जमातींसाठी आणि २७ टक्के आरक्षण हे इतर मागासवर्गीय जातींसाठी निश्चित आहे जे ४९.५ टक्के इतके आहे आणि ५० टक्के आरक्षणाची मर्यादा घालण्याचे कारण म्हणजे समानता.समानता प्रस्थापित राहावी ह्यासाठी ५० टक्के आरक्षण हे मागासवर्गीय घटकांसाठी आणि ५० टक्के जे प्रगत म्हणजे फॉरवर्ड क्लास साठी असेल.

अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे एससी आणि एसटी यांच्यासाठी क्रीमी लेअरची कोणतीहि अट नाही.कारण हा समाज सर्वात जास्त शोषित,वंचित,आणि हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जाती व्यवस्थेने मोडून पडलेला समाज आहे त्यामुळे जोपर्यंत हा समाज पुरेसा मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत आरक्षण रद्द करता येणार नाही.

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या ५०% मर्यादेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले हे साफ खोटं आहे इंद्रा सोहनी आणि मराठा आरक्षणाचा चुकीचा संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला जातोय.न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्टपणे नमूद केले आहे कि इंद्रा सोहनी खटल्याच्या निर्णयाच्या फेरविचार करण्याची गरज नाही.

मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास नाही मराठा समाजाला ५०% आरक्षणाची मर्यादा ओलांडून नवीन आरक्षण देऊ करण्यासाठीचा कोणताही वैध आधार वाटत नाही.मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असा दर्जा देता येणार नाही. असं करुन त्यांचा समावेश मागास समाजांमध्येही करता येणार नाही.महाराष्ट्र मागासवर्ग आयोगानं गायकवाड समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असं म्हटलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं ते अमान्य केलं आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास गट (EWS) आरक्षण

बहुजन समाज पार्टी म्हणजे बसपा यांनी २००७ मध्ये जे खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब घटक आहेत त्यांच्यासाठी आरक्षण हवे हि मागणी केली होती.

पण हे आरक्षण देण्याचे प्रयत्न १९९२ पासूनच सुरु होत होते.खुल्या प्रवर्गातील म्हणजे ओपन वर्गातील जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत अश्या लोकांना केंद्र सरकारने १०% आरक्षण जाहीर केले आहे.जर ५०% एवढेच आरक्षण देऊ शकतो असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले असता हे आरक्षण असे काय केंद्र सरकारने देऊ केले आहे.वर म्हणल्याप्रमाणे इंद्रा सोहनी यांच्या खटल्याप्रमाणे ५०% आरक्षणाची मर्यादा घालण्यात आली जर ती मर्यादा ओलांडायची असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते आणि त्यासाठी पाहिजे बहुमत जे सरकारकडे आहे.भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १५ आणि १६ यांमध्ये बदल करून आरक्षण देता येऊ शकते.ह्यासाठी एक बिल तयार होते आणि मा ते लोकसभेत ठेवले जाते आणि मतदान करून ते पारित केले जाते आणि मग ते बिल राज्यसभेत पाठवले जाते तिथे पारित करून ते बिल राष्टपती यांच्याकडे पाठवले जाते त्यांची स्वाक्षरी झाल्यावरच त्या बिलाचे कायद्यात रूपांतर होते.आता खुल्या प्रवर्गातील समाजाला १०% आरक्षण आहे,त्यासाठी काही निकष लावले गेले आहेत जसे EWS आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा कमी हवे.५ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असावी.स्वतःचे घर १००० चौरस मीटरपेक्षा कमी असावे.अश्या प्रकारे भारतात आता ६०% आरक्षण आहे.पण विविध राज्यात आकडे वेगळेच आहेत ते कसे ते पाहू.

तामिळनाडू आरक्षण धोरण

भारतात जर सर्वोच्च न्यायालयाने ५०% आरक्षणाची मर्यादा घातली असताना तामिळनाडू हे राज्य ६९% आरक्षण कसे काय देऊ करते.मंडल आयोगाने ओबीसी समाजाला २७% आरक्षण देण्याची शिफारस केली.आणि १९९० साली तत्कालीन पंतप्रधान वीपी सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी मान्य करून ओबीसी समाजाला आरक्षण देऊ केले,पण ह्या आदेशाविरुद्ध पत्रकार इंद्रा सोहनी यांनी ह्या आरक्षणाविरुद्ध १ ऑक्टोबर १९९० रोजी सर्वोच्च न्यालयालात याचिका दाखल केली.आणि यासंदर्भातला निकाल १६ नोव्हेंबर १९९२ या दिवशी सर्वोच्च न्यालयालाच्या ९ न्यायाधीशांच्या बेंचने दिला.आणि आरक्षणावर ५०% ची मर्यादा घातली.तामिळनाडू सरकारने १९८५ सालीचा ओबीसी समाजाला ५०% आरक्षण देऊ केले होते म्हणजे ओबीसी प्रवर्गाला ५०% आणि अनुसूचित जाती आणि जमाती यांना १८% असे एकूण ६८% आरक्षण देऊ केले.जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ५०% आरक्षणाची मर्यादा घातली तेव्हा पहिल्यापासूनच तामिळनाडू राज्यात ६८% आरक्षण चालू होते.त्यामुळे तामिळनाडू मधील आरक्षण हे अवैध्य ठरत होते तेव्हा १९९४ साली तत्कालीन सर्व खासदारांनी एकत्र येऊन केंद्र सरकारला हे आरक्षण घटनेच्या नवव्या अनुसूचीमध्ये म्हणजे नवव्या शेड्युलमध्ये घालण्यासाठी दबाव आणला आणि ती सुधारणा करूनसुद्धा घेतली त्यामुळे तामिळनाडू राज्याच्या आरक्षणाविरुद्ध कोणालाही न्यायालयात जाता येत नाही.आणि जयललिथा यांचे सरकार असताना ओबीसी समाजाला ३०% एमबीसी समाजाला २०% एससी समाजाला १८% तर एसटी समाजाला १% असे आरक्षण एकूण ६९% आरक्षण धोरण तयार केले.त्यामुळे तामिळनाडू राज्याच्या आरक्षणाला घटनेचे कवच प्राप्त झाले.

१९९४ साली सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला एक अंतरिम आदेश काढला तो असा कि या जास्तीच्या आरक्षणामुळे एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल की जो मेरिट मध्ये वर आहे आणि केवळ आरक्षणामुळे त्याला शिक्षणापासून वंचीत रहावं लागतय तर त्या त्या शैक्षणिक संस्थांमध्ये राज्य सरकारने अशा मेरिटोरियस कॅंडिडेट्स साठी जास्तीच्या जागा निर्माण कराव्यात.तशा पध्दतीने आजही तामिळनाडू सरकारला जास्तीच्या जागा निर्माण कराव्या लागत आहेत. म्हणजे होतय काय की २०० पैकी १९८ गुण एखाद्याला मिळाले असतील तर तो सरळ कोर्टात जातो त्यावर सुप्रीम कोर्ट राज्य सरकारला ऑर्डर देते की १९९४ च्या अंतरिम ऑर्डरचं पालन राज्य सरकारने करावं.आणि मग त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो .पण ह्या आरक्षणाची मर्यादा हि १० वर्षे होती म्हणजे हे आरक्षण दर १० वर्षांनी वाढवावे लागते.जेव्हा २००४ साली ह्या आरक्षणाची वैधता संपली आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.तेव्हापासून तामिळनाडूतील आरक्षणावरील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

आरक्षणबद्दलचे काही गैसमज

भारतात हजारो वर्षांपासून जाती व्यवस्थेचे विष आहे म्हणूनच त्यासाठी आरक्षण नावाचे औषध आहे.ज्यादिवशी जाती व्यवस्थेचा समूळ नाश होईल तेव्हा आरक्षणाची ह्या देशाला गरजच भासणार नाही.आरक्षणाचे मुख्य उद्दिष्ट हे दबक्या पिचलेल्या समजला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांनासमाजात समान वागणूक मिळावी ह्यासाठी आरक्षण असते.अचानक हा अस्पृश्य समाज जर पुढे जात असेल तर काही जणांना मिरच्या ह्या झोंबणारच त्यासाठी सुरु होतो प्रोपोगांडा एखाद्या विषयच अपप्रचार आणि हेच आरक्षणाबद्दल अनेक वर्षे केले जात आहे आणि माथी भडकवली जात आहेत.

१. अनेक श्रीमंत लोकं हे आरक्षणाचा लाभ घेतात कारण ते अनुसूचित जाती जमातीमध्ये येतात-

अनुसूचित जाती आणि जमाती यांना मिळालेले आरक्षण हे आर्थिक निकषांवर नसून ते सामाजिक मागासवर्गीय आहेत ह्या निकषांवर दिले आहे.जर एखादा कोणी चांगले पैसे कमवत असेल परंतु त्याला इतर समाजापेक्षा नीच वागणूक दिली जात असेल आणि त्याला अस्पृश्य समजून वेगेळे ठेऊन त्याला शिव्या देणे,अन्न पाणी घेण्यापासून विरोध करणे अश्या गोष्टी सर्रास घडल्या असतात किंबहुना अनेक ठिकाणी घडतही आहेत त्यासाठी ज्या जातिंना आरक्षणाचे कवच आहे.

आरक्षण संपवण्याच्या दृष्टीने पावले टाकायचे असतील तर ते फक्त सवर्ण लोकांच्या शूद्र अस्पृश्य लोकांच्या वागवण्याच्या वृत्तीवर अवलंबून असेल.असे डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे म्हणणे आहे.

via Getty Images)

२.आरक्षणामुळे देश शेकडो वर्षे मागे गेलाय!

खरंच! आरक्षणामुळे देश मागे गेलाय कि पुढे जातोय.काहीजणांना काहीही झालं ह्या देशात कि आरक्षणावर बोट ठेवतात.लक्षात ठेवा आर्थिक प्रगती करायची असेल तर सर्वाना सामान संधी ह्या भेटल्याच पाहिजे त्याशिवाय कुठलाच देश हा प्रगती करू शकणार नाही.प्रत्येकाला आपल्या कार्यक्षमेनुसार,आवडीनुसार  काम करण्याचा आणि शिक्षण घेण्याचा अधिकार हवा.ह्यातूनच आपला देश प्रगतीपथावर चालू शकेल.

३. जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता ह्या जुन्या गोष्टी आहेत आरक्षण चालू राहिले तर हा देश कधीच पुढे जाऊ शकणार नाही.

खुल्या प्रवर्गाचे नेहमी एक म्हणणे असते कि जाती व्यवस्था वगरे ह्या गोष्टी जुन्या काळी होत्या आता त्याची गरज नाही मग आरक्षण कशासाठी? हजारो वर्षे चालत आलेल्या हि जातीपातीबद्दलचा द्वेष ह्या मातीत भिनला आहे अजूनही जातीपातीच्या नावावर अत्त्याचार होतच आहे मारणे,लुटणे,बलात्कार,छळ हे अजूनही ह्या देशात चालू आहे फरक हा आहे कि आपल्याला ह्याबद्दल कळत नाही.आजच्या कळत जातीपाती मनात नाही हि चांगलीच गोष्ट आहे पण अशी किती लोकं आहेत हेपण पाहण्याची गरज आहे.शहरात अजून जातींवरून हिनवले झाले तिथे खेडेगावाचं काय घेऊन बसलात.

४.आरक्षण घेणार्यांनी अर्ज केला तरी सरकारी नोकरी भेटते

हे वाक्य तर बाबा प्रत्येकाच्या ओठांवर असते तुमचं बरं आहे तुम्ही अर्ज केला तरी सरकारी नोकरी भेटते.असं होता पहले जेव्हा आरक्षण देऊ केले तेव्हा तितकी जनजागृती झाली नव्हतं त्यामुळे आरक्षित जागा भरल्याचा जात नव्हत्या जर जागाच शिल्लक असतील तर अर्ज कोणीजारी भरला तरी त्याला नोकरी किंव्हा शाळा कॉलेजला सहज प्रवेश मळू शकेल कारण तिथे अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी आहे.

आता तुम्ही साधा विचार करा मराठ्यांना आरक्षण भेटले तर जागा १०० असतील आणि त्यासाठी अर्ज ७० आले असतील असे होणार नाही पण समजा झाले असे तर ज्याला ३५% असतील त्याला सुद्धा प्रवेश मळू शकेल कि नाही.तेच एससी साठी लागू होत.पण आता अशी परिस्थिती नाहीये एका एका जागांसाठी आता हजारो अर्ज येतात त्यामुळे आरक्षित समाजाचे मेरिट हे खुल्या प्रवर्गातील मेरिटच्या जवळच येत आहे त्याला कारण आहे जनजागृती शिकण्याची इच्छा,चांगले आयुष्य जगण्याची इच्छा,काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि हे फक्त शक्य झालय आरक्षणामूळे.

काहीजण आरक्षणाला कुबड्या म्हणतात तर काही तुमचे कर्तृत्व हे आरक्षणाशिवाय शून्य आहे.पण ह्याच जाती व्यवस्थेने ह्या समाजाला आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वंचित ठेवलं गेलं.आणि हा समाज काय कमी वाटतो का एकूण लोकसंख्येच्या २२%(एससी,एसटी) समाज आहे हा त्याला असच दाबून ठेवायचं होत का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तर शिव्या देण्यात लोकं इतकी धन्यता मानतात कि काय म्हनायचं. त्यामुळे वव्हाट्सअँप आणि सोशल मीडियामध्ये जे फिरत जे तुच्या माथी मारलं जात ते सत्य नव्हे.कुणी संत्र्या मंत्र्या नेत्याचं नका ऐकू स्वतः वाचा आणि ठरवा काय सत्य आणि काय असत्य.

सुगंध देणे फुलाचा गुणधर्म आहे,त्या फुलाला तुम्ही कितीही चिरडलं तरी ते सुगंध देण्याचे थांबत नाही.

-अभि

नॉन फंजिबल टोकन (NFT)

Non Fungible Token

नवनवीन तंत्रज्ञानाने जग वेगाने बदलत आहे. बदलण्याचा वेग इतका वेगवान आहे किकधीकाळी अनपेक्षित वाटणाऱ्या गोष्टी इतक्या सहजासहजी शक्य होत आहे, सत्यात उतरत आहेत, कालचच उदाहरण घ्या उडणारी कारच बनवली एका पट्ठ्याने. कधी काळी मोबाईलचा उपयोग हा फक्त इतरांशी बोलण्यासाठी इतकाच होता आणि आता बोलणे, फोटो, विडिओ, सोशल, पैशांचे व्यवहार अगदी सर्व काही एका टच होतंय कि! आपण शाळेत शिकलो होतो मनुष्य हा सर्वात स्मार्ट प्राणी आहे आता तर फोन पण स्मार्ट आलेत. म्हणजे सांगायचं काय तर काळानुसार गोष्टी बदलत जातात तंत्रज्ञान प्रगती करत जाते. आत्तापर्यन्त आपल्याला एवढे माहित होते कि आपल्याला काही वस्तू किंव्हा सेवा विकत घेयची असल्यासत्यासाठी आपल्याला त्याचे मूल्य मोजावे लागते, म्हणजे आपल्याला त्यासाठी रुपये द्यावे लागतात आणि जर इतरदेशांबरोबर काही देवाणघेवाण करायची असल्यास डॉलर आणि इतर पैशांमध्ये तो करता येतो आता नवीन एक भानगड आली आहे ती म्हणजे क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल पैसे थोडक्यात सांगायचे झाले तर नॉन फिजिकल स्वरूपात असलेले पैसे म्हणजे क्रिप्टो जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉक चेन याबद्दल काही माहित नसल्यास ह्या लिंक वर क्लिक करून तुम्ही क्रिप्टोकरन्सीबद्दलची माहिती वाचू शकता.

क्रिप्टोकरन्सी : भविष्यातील चलन

हे क्रिप्टोच कोड अजून भारत सोडवत होत ना होतं त्यात आता एनएफटी म्हणून कायतरी नवीनच खुळ जन्माला आलंय. एनएफटी म्हणजेच नॉन फंजिबल टोकन एनएफटी हे डिजिटल स्वरूपातलं मार्केट आहे, इथे ठोस स्वरूपात असे काही नाही जे काही असेल ते सर्व फक्त डिजिटल स्वरूपातच आहे. एनएफटी हे इथेरियम ह्या ब्लॉक चेन वरील आधारित एक क्रिप्टो म्हणजे डिजिटल टोकन आहे. ह्यामध्ये फंजिबल म्हणजे एखादी वस्तू आहे तिचे मूल्य तुम्ही विभागून सुद्धा देऊ शकता अशी वस्तु म्हणजे फंजिबल. समजा तुमच्याकडे २०००₹ ची नोट आहे तुम्ही काही सामान खरेदी केले आणि त्याबदल्यात त्या सामानाचे मूल्य म्हणून तुम्ही २०००₹ ची नोट देऊ केली. आता समाजा तुमच्याकडे २०००₹ ची नोट नाही पण ५००₹ च्या ४ नोटा आहेत जी वस्तू आहे तिचे मूल्य २०००₹ आहे मग तुम्ही २०००₹ ची एक नोट देऊ केली कि ५००₹ च्या ४ नोटा नोटांचे मूल्य हे सारखेच राहते, म्हणजे हे झाले फंजिबल.

WazirX Cryptocurrency Market

आता क्रिप्टोचंच घ्या समजा तुम्हाला बिटकॉइन घेयचे आहे तुम्ही बिटकॉइन घेयला तुमच्या ब्रोकरकडे गेलात तेव्हा तुम्हाला कळले कि एका बिटकॉइनची सध्याची किंमत हि २५ लाख ₹ आहे पण तुमच्याकडे इतके पैसे नाही ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही बिटकॉइन घेऊ शकत नाही बिटकॉइन हे अनेक अंशामध्ये विभागले गेले आहे त्यामुळे तुम्ही अगदी १००₹ चे सुद्धा बिटकॉइन घेऊ शकता ह्यालाच फंजिबल टोकन म्हणतात. तर टोकनंच का? तर ज्या क्रिप्टोकरन्सीच्या आधारे ह्या व्यवहार होतो त्याचे व्यासपीठ हे इथेरियम हे टोकन आहे म्हणजे इथेरियम हे सर्वात सुरक्षित अश्या ब्लॉक चेन तत्वावर आधारित तंत्रज्ञान आहे. एनएफटीमध्ये सर्व काही हे डिजिटल स्वरूपातच होतं आहे तुमचा व्यवहार तुम्हाला त्या बदल्यात भेटलेली वस्तूहि सुद्धा तुम्हाला डिजिटल स्वरूपातच भेटणार आहे.

Photocopy of Original Mona Lisa Art

आता पाहूया नॉन फंजिबल काय आहे. फंजिबलच्या अगदी उलट आहे नॉन फंजिबल म्हणजे एखादी कलाकृती आहे किंव्हा वस्तू आहे ती एकमात्र आहे म्हणजे ती कलाकृती जेव्हा घडवली तेव्हा ती एकच होती अथवा एखादी गोष्ट हि एकच आहे त्याची नक्कल नाही ह्या सर्व गोष्टी नॉन फंजिबल मध्ये येतात. समजा आपल्या देशात सापडलेला कोहिनुर हा हिरा हा ह्या जगात एकच आहे किंव्हा ताजमहाल हा सुद्धा एकच आहे त्याला विभागले जाऊ शकत नाही म्हणजे असे काही आहे कि बाबा त्या ताजमहालचे २ तुकडे करून २ वेगळे पूर्ण ताजमहाल तयार होतील आणि त्यांचे मूल्य हे समान राहील, नाही म्हणजेच ते नॉन फंजिबल आहेत. आता समजा लिओनार्डो विंची ह्यांनी काढलेली सर्वोत्तम चित्र म्हणजे मोनालिसा आता ते चित्र हे एकमेव आहे त्याचे सर्व हक्क हे लिओनार्डो ह्यांच्याकडे आहेत दुसरे कोणी त्या चित्राची नक्कल नाही करू शकत आणि हुबेहूब जरी नक्कल केली तर त्याची गणना हि कॉपी म्हणूनच केली जाईल.

NFT Market

अश्या काही तुम्ही स्वतः तयार केलेल्या कलाकृती असतील म्हणजे संगीत, चित्र, तुमच्याकडे असलेले जुन्या वस्तू ह्या वस्तू तुम्ही विकण्यासाठी तयार करण्यात आलेले व्यासपीठ म्हणजेच एनएफटी मार्केट ह्यात तुम्हाला तुमची कलाकृती विकण्यासाठी एक टोकन जरी केले जाते आणि जेव्हा तुमची कलाकृती घेण्यासाठी इच्छूक असेल तेव्हा तो तुम्हाला इथेरियमद्वारे विकत घेऊन तुम्हाला त्याला सर्व हक्कांसह ती कलाकृती त्याला विकावी लागेल.

एनएफटी वर जेव्हा तुम्ही काही विकत घ्याल किव्हा विकत असाल तेव्हा ती वस्तू हि फक्त डिजिटल स्वरूपात देवाणघेवाण करावी लागते इथे कुठेही भौतिकदृष्ट्या तुम्हाला ती वस्तू भेटणार नाही समजा तुम्ही एखादे चित्र विकत घेतले तर तुम्हाला त्याची जेपीजी फाईल किव्हा त्यासंबंधित एक्सटेंशन स्वरूपात तुम्हाला दिली जाईल. तसेच जीआयएफ फाईल एमपीफोर फाईल. ह्या नवीन तंत्रज्ञाचा फायदा सर्वात जास्त जे कलाकार आहेत डिजाईनर आहेत याना आहे. कारण आजकाल होतंय काय समझा एकानी एक कॅलीग्राफी तयार केली आणि इंटरनेटवर टाकली तर त्या फाईलला अनेक जण डाउनलोड करतात आणि स्वतः वापरात आणतात किंव्हा त्यावरील त्याचे नाव मिटवतात आणि आपणच ती फाईल तयार केली आहे असा भासवून पैसे कमावतात त्यामुळे ज्याने ती कलाकृती तयार केली आहे त्यांची ओळख पुसली जाते आणि त्या कलाकृती चे श्रेय त्यांना मिळत नाही. एनएफटीवर काय होणार तुम्ही एखादी कलाकृती विकण्यासाठी टाकली तर तुम्हाला त्याचे क्रिप्टोटोकन मिळेल आणि तशीच नक्कल असलेली कलाकृती कोणी विकण्यास आणली तर ती विकली जाणार नाही. त्यामुळे जे मूळ मालक किंव्हा क्रीएटर आहेत त्यांना त्यांचा मोबदला मिळेल. आणि हे तंत्रज्ञान ब्लॉकचेन ह्या तंत्रज्ञावर आधारित असल्यामुळे इथे जेव्हा एखादी नोंद होते ती कधीच मिटवता येत नाही आणि पुढे कोणी कोणी त्या वस्तूला खरेदी केले हे सुद्धा अद्यावत होत जाते.

First Tweet of Twitter CEO Jack Dorsey

ट्विटर ह्या सोशल मीडियाच्या सीईओ जॅक डोर्सी याने आपले पहिले ट्विट हे विकायला काढले आणि ते विकत घेण्यासाठी लोणची बिडिंग सुरु झाली.

एनएफटीचा उद्देश जरी चांगला असला तरी त्यात अनेक अडचणी आणि फसवाफसवी चालू आहेत, कित्येक लोकांना हेच माहित नाहीत कि त्यांच्या कलाकृती ह्या परस्पर त्याना न विचारता विकल्या जात आहेत,

NFT Scam

सध्या अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या चोरून स्वतः आपण त्या गोष्टीचा मालक आहे असं भासवून दुसर्यांना विकल्या जात आहेत त्यामुळे हे कठीण आहे कि विकणारा माणूस हाच खरा  मूळ मालक आहे कि नाही. पण लवकरच ह्यावरसुद्धा तोडगा निघेल.

एनएफटी बाजार

२०१८ साली एनएफटीचे भांडवल हे ४ कोटींच्या घरात होते ते वाढत दोन वर्षात ४० कोटी इतके झाले आहे. मागच्या वर्षी जो वेग पकडला आहे तो अजून तसाच पुढे चालू आहे लवकरच एनएफटीचे मार्केट हे ४०० कोटींवर पोहचेल ह्यात शंका नाही.

Source : Forbes

जिथे एनएफटी आधारे तुम्ही डिजिटल वस्तूंचे आदान प्रदान करता त्याला म्हणतात एनएफटी मार्केट प्लेस.

जिथे एनएफटीच्या आधारे तुम्ही डिजिटल वस्तूंचे आदानप्रदान करता त्याला म्हणतात एनएफटी मार्केट प्लेस,भारतात बघायला गेलं तर नुतकेच वझीरX ह्या क्रिप्टोवर आधारित ब्रोकरने एनएफटी मार्केट हि सुविधा उपलब्ध करून दिली आहे.ह्यात तुम्ही तुमच्याजवळ असलेले कार्ड्स,स्टॅम्प्स,चित्रे,आभासी मालमत्ता म्हणजे वर्चूएल असेट्स,फोटो व्हिडिओस तुम्ही तयार केलेलं मिम्स,जीआयएफ,संगीत विकू शकता.

Source : mint
India’s WazirX NFT Market Place

ह्याव्यतिरिक्त एनएफटीच्या अंतर्गत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स येत आहेत म्हणजे अँप्स,वेबसाईट आणि तेच आपलं भविष्य आहे द फ्युचर इज हिअर म्हणतात ते हेच.

क्रिप्टो पंक

क्रिप्टो पन्क्स हे २०१७ मध्ये अल्गोरिदमने तयार केलेलं एक नॉन फंजिबल टोकन आहे हे एक प्रकारचे क्रिप्टो आर्ट आहे,सध्या हे खूपच प्रसिद्ध होत चालले आहे.

क्रिप्टो किटीज

Source : CNN Twitter

क्रिप्टो किटीज हि एकप्रकारची आभासी मांजर आहे किंव्हा तुम्ही ह्याला डिजिटल मांजरसुद्धा म्हणू शकता.क्रिप्टो किटीज ह्या टोकनद्वारे तुम्ही मांजर विकत घेऊ शकता आणि त्याचे प्रजनन करून पैसेसुद्धा कमाऊ शकता आहे कि नाय काहीतरी विलक्षण गोष्ट,म्हणजे आपण खऱ्या आयुष्यात कुत्री मांजर पाळतो आणि त्यांच्या पिल्लाना आपण दुसऱ्याला विकतो त्यातून नफा कमावतो इथेपण तेच आहे फक्त डिजिटल स्वरूपामध्ये.

https://www.cryptokitties.co

जशी प्रत्येक मांजर हि जन्मतः दिसायला इतरांपेक्षा वेगळी असते तसेच इथेसुद्धा प्रत्येक मांजर हि वेगळी असते एकसारखी दिसणारी मांजर तुम्हाला भेटणार नाही.आणि सध्या हे क्रिप्टो किटीज खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे.हे म्हणजे एकप्रकारचे वर्चूएल पेट म्हणतात तसं काहीसं प्रकार आहे.आणि ह्यात वैशिष्ट असं कि प्रत्येक मांजर हि दिसायला वेगळी असते म्हणजे तिची पिल्ले सुद्धा हि दिसायला वेगळी असतात त्यामुळे प्रत्येक मांजरीची किंमत हि वेगळी असते.आज मांजर आहे उद्या कुत्रा येईल पुढे पक्षी वगरे पण सुरवात तर मात्र दमदार झाली आहे.

क्रिप्टो वोक्सेल्स

तुम्हाला स्वप्न पडलं कि मी १० एकर जागा घेतली आहे आणि मस्त तिथे एक आलिशान बिल्डिंग उभी केली आहे डान्स पब वगरे उभं केलंय आणि तुम्ही जागे होता आणि विचार करता यार हे जर सत्यात उतरलं तर काय राडाच होईल राव! हा प्रोजेक्टपण तसाच आहे तुमच्या स्वप्नांना आभासी जगात घेऊन जाणारे इथे तुम्ही डिजिटल जमीन विकत घेऊ शकता तिथे इमारती,शोरूम, मोठे डान्स फ्लोअर, ऑक्शन हाऊस उभारू शकता आणि ते भाड्याने देऊन,तिथे वेगवेगळे आभासी कार्यक्रम करून पैसे कमवू शकता.

Crypto Voxel Project

ऱेऱीबल

ऱेऱीबल ह्या टोकेनद्वारे तुम्ही डिजिटल संग्रहित वस्तू विकत देऊ आणि घेऊ शकता.

https://rarible.com

ओपनसी

https://opensea.io

ओपेनसी हे पीअर टु पीअर मार्केट प्लेस आहे,ह्या टोकेनद्वारे तुम्ही तुमच्याकडील चित्रे,मिम्स,फोटो,व्हिडिओज,लुपींग विडिओ विकत घेऊ शकता आणि विकू शकता,हे टोकन कन्टेन्ट क्रीएटरसाठी खूप उपयुक्त आहे.

आवेगोशी

https://rinkeby.aavegotchi.com

आवेगोशी हे टोकन डी सेंट्रलाइज्ड फिनान्स ह्या तत्वावर आधारित असं क्रिप्टो प्रोजेक्ट आहे.ह्या टोकनद्वारे तुम्ही आवेगोशी म्हणजे गेमिंग अवतार विकत घेऊ शकता संग्रहित करू शकता.

एखादे तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा ते येताना चांगली आणि वाईट गोष्ट सुद्धा घेऊन येतं.म्हणजे नवनवीन तंत्रज्ञान मानवाचे आयुष्य तर सुखकर करतं पण ह्याची किंमत मात्र निसर्गाला मोजावी लागते.कुठलीही गोष्ट घ्या म्हणजे पेट्रोल,इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंव्हा गॅझेट,प्लास्टिक ह्यामुळे पर्यावरण किती प्रदूषित होत आहे ह्याचा परिणाम हा पशु पक्षी प्राणी वन्यजीव सागरीजीव ह्यांना भोगावा लागत आहे.क्रिप्टोचेसुद्धा निसर्गावर परिणाम हे वाईटच होत आहे ज्या क्रिप्टो चलन आहेत ते तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात विजेचा आणि ग्राफिक्स कार्डचा उपयोग करावा लागतो त्यामुळे पर्यावरणात कार्बनचे प्रमाण वाढते.

Source : http://carbongrid.io

बिटकॉइन माईन करताना जीवाश्म इंधनाचा वापर करून खूपप्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित केला जातो त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.त्यात आता बिटकॉइन माईनसाठी अक्षय ऊर्जेचा उपयोग केला जातो खरा पण त्यांचे प्रमाण सध्या तरी नगण्य आहे पुढे कदाचित वाढू शकेल.

Annual CO2 Emissions WW Data

मनुष्याला तंत्रज्ञान तयार करताना आता पर्यावरणाचासुद्धा विचार करावा लागणार आहे सध्या पर्यावरणाचा ऱ्हास हा अतिजलद गतीने होत आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागत आहेत नाहीतर असं नको होयला कि माणूसच ह्या पृथ्वीतलावावरूनच गायब होईचा.

-अभि

References –

Wall Street Journal

Crypto.com

राजा शिवछत्रपती यांच्या तलवारी

आजवर संपूर्ण हिंदुस्थानात अनेक राजे महाराजे होऊन गेले पण त्यात एक नाव प्रखरपणे ४०० वर्षे होत असताना संपूर्ण भारतीयांच्या ह्रिदयात जिवंत आहे ते म्हणजे शककर्ते श्री छत्रपती शिवाजीराजे महाराज अस काय व्यक्तिमत्व होते ते अशी कोणती ऊर्जा आहे किआजही ते ह्या मातीत अजूनही राज्य करत आहे जेव्हा संपूर्ण हिंदुस्थानात जुलमी मुस्लिम राजवट राज्य करत होती अर्थातच त्यात हिंदूराजेही होते सन १२९३ साली अलाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर हल्ला करून सर्व देवगिरी लुटून गेला आणि हा महाराष्ट्र प्रांत गुलाम झाला.त्यानंतर इतके वर्षे सरली स्वराज्य स्थापन होयला हिंदूंचे राज्य ‘हिंदवी स्वराज्य’ आज भारतात लोकशाही आहे राजेशाही आपल्या देशाने नाकारली पण तरीसुद्धा लोकशाहीमध्ये ह्या एकाच राजाचा का एवढा गाजावाजा! छत्रपती शिवराय यांचे स्वतःचे राज्यस्वतः निर्माण केले होते त्यांना वारसा हक्काने काही मिळाले नव्हते त्यांनी स्वराज्य स्थापन करून रयतेचे राज्य निर्माण केले नवीन कायदेनिर्माण केले अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून कारभार चालवला शिवछत्रपतींनी लढाया फक्त तलवारी आणि सैन्याने न लढता त्या कुशल बुद्धीने लढल्या. छत्रपती शिवरायांनी ज्या तलवारींसोबत स्वराज्याचा कारभार सांभाळला त्या तलवारी मात्र त्यांच्याच मातीत नसाव्यात हि गोष्ट मात्र मनामध्ये सलते.

छत्रपती शिवराय यांच्याकडे ३ प्रमुख तलवारी होत्या त्यांना आपल्या महाराष्ट्रातील कुळांच्या देवींचे नाव दिले होते तुळजा,भवानी आणि जगदंबा अश्या तीन महाराजांच्या तलवारी होत्या असं इतिहासात सापडते पण त्या तलवारी आत्ता कुठे आहेत भारतात कि आणखी कुठेते पाहुयात :

तुळजा तलवार

छत्रपती शिवराय यांनी फक्त ह्या तीनच तलवारी वापरल्या होत्या का? तर नाही त्या काळी प्रत्येक राजे महाराजे ह्यांच्याकडे अनेक तलवारी होत्या काही तयार करून घेयचे तर काही तलवारी त्यांना नजराणा किंव्हा भेट म्हणून दिल्या जायच्या.छत्रपती शिवराय यांच्याकडे सुद्धा अनेक तलवारी होत्या लढाईच्या तलवारी ह्या वेगळ्या असत नाही दाखवण्याच्या म्हणजे कोणी दुसरे राजे महाराजे याना भेटण्यास जाण्यासाठी अथवा सण समारंभासाठी सुद्धा वेगळ्या तलवारी होत्या.त्यांच्या तलवारीच्या संग्रहामध्ये मात्र तुळजा भवानी आणि जगदंबा ह्या प्रमुख तीन तलवारी होत्या त्यातली तुळजा तलवार हि तलवार छत्रपती शिवरायांना श्री.शहाजीराजे भोसले यांनी जेजुरी येथे भेट म्हणून दिली.साल १६६२ साली शहाजीराजे हे स्वराज्याचा कारभार बघण्यासाठी आले होते त्याकाळी आपल्या अपत्याला भेट म्हणून काही वस्तू दिल्या जात इतके वर्षे परिवारापासून लांब राहत असल्याकारणाने आपल्या अपत्यांना अश्या तलवारी,घोडे,सोने,स्वरूपात भेट दिल्या जात.शहाजीराजे यांनी छत्रपती शिवराय याना जी भेट दिलेली अप्रतिम सुरेख तलवार होती हि  तलवार आपल्या वडिलांनी आपल्याला दिली हाच आपल्या तुळजा भवानीचा  आशीर्वाद समजून त्यांनी तिचे नाव तुळजा असे ठेवले होते.हि सध्या कुठे आहे माहित नाही अजूनपर्यंत हि तलवार समोर आली नाही,हि तलवार कालबाह्य झाली असेल असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.

भवानी तलवार

दुसरी तलवार म्हणजे भवानी तलवार हि तलवार साक्षात भवानी मातेने शिवरायांना दिली असे आपल्याला सांगून  आपल्याला मुर्खात काढण्यात आले,अजूनही खूप लोकांना हेच वाटत आहे पण हे खोटं आहे हि तलवार सर्वप्रथम भारतामध्ये बनवली गेलेलीच नाही हि युरोपियन बनावटीची आहे त्यामुळे भवानी मातेने दिले वगरे ह्याला काही अर्थ उरत नाही. साल १६५९  या वर्षी छत्रपती कोकण दौऱ्यावर होते त्यावेळी छत्रपती शिवराय असे अनेक दौरे करत असत सर्व व्यवस्था कशी आहे हे समजून घेण्यासाठी हे दौरे असत.कोकण दौऱ्यावर गेले असताना कोकणातील खेम सावंत अंबाजी सावंत त्यांचा मुलगा कृष्णाजी सावंत यांनी शिवरायांना हि तलवार भेट स्वरूपात दिली होती,हि तलवार अंबाजी सावंत यांच्याकडे कशी आली? तर  ह्याच सुमारास कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांचे एक जहाज अडकून पडले होते,ह्याचाच फायदा घेऊन अंबाजी सावंतांनी ह्या जहाजावर हल्ला चढवला आणि त्या जहाजामधील सर्व गोष्टी जप्त करून घेतल्या त्या सामानात सोने हिरे चांदी होते ह्यात एक सुंदर रत्नजडित दुधारीअशी एक तलवार होती ती तलवार त्या पोर्तुगीज सेनापती यांची होती.हे सर्व सामान सावंतांनी जप्त करून घेतले आणि जेव्हा छत्रपती शिवराज हे कोकण दौऱ्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराज हे कोकणच्या सप्तकोटेश्वर मंदिरात आले होते,हे मंदिर मुस्लिम आक्रमणे आणि पोर्तुगीजांनी पाडले उध्वस्त केले पण काही लोकांच्या प्रयत्नाने तिथे जे शिवलिंग होते ते तिथून घेऊन डीचोळी येथे नेण्यात आले आणि तिथे नवीन मंदिर उभारून ह्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाते करण्यात आली.

Saptakoteshwar Mandir Build By Chatrapati Shivaji Maharaj

तेव्हा कृष्णाजी सावंत यांनी पोर्तुगीजांची जप्त केली अमूल्य रत्नजडित दुधारी तलवार शिवरायांना भेट स्वरूपात दिली हीच ती भवानी तलवार ती तलवार पोर्तुगीजमध्ये बनवलेली सरळ पात्याची वजनाने हलकी पातळ हलकी होती ह्या तलवारीची लांबी हि ४ फूट आहे उत्कृष्ट दर्जाची तलवार होती हि तलवार महाराजांना इतकी आवडली कि त्यांनी त्याकाळी त्या तलवारीच्या बदल्यात सावंत याना ३०० होन म्हणून मोबदला दिला होता. ह्या पोर्तुगीज तलवारीचे नाव त्यांनी भवानी तलवार असे ठेवले,त्याकाळी भारताबरोबर व्यापार करण्याच्या हेतूने इंग्रज,डच,पोर्तुगीज,स्पेन अश्या अनेक विदेशी युरोपियन देशातून अनेक जहाजांमधून येत असत त्यांना त्यावेळी फिरंगी म्हणून संबोधत हि तलवार भारतामधून बनवलेली नव्हती हि फिरंगी पोर्तुगीजनांकडून मिळवली होती म्हणून अश्या बनावटीच्या तलवारीनं फिरंगी तलवार अथवा फिरंग तलवार म्हणून संबोधले जायचे.

जगदंबा तलवार

जेव्हा कोकणच्या सावंताडून फिरंगी तलवार हि भेट म्हणून देण्यात आली ती तलवार शिवरायांना प्रचंड आवडली आणि अश्याच  स्वरूपाच्या तलवारी पातळ वजनाने हलक्या आपल्याही सैन्यात असाव्यात असे शिवरायांना वाटले शिवरायांची लढाई हि फक्त मैदानात उतरून गनीम कापणे इतकीच नव्हती आपले सैन्य आपले मावळे हे कमी काळात आणि जास्त वेगाने कसे लढतील ह्यावर महाराजांचे पूर्ण लक्ष असायचे मैदानात लढाई करत असताना जास्त वजनाच्या तलवारी नेण्यात काही योग्य नव्हते म्हणून ह्या फिरंगी तलवारी आपल्या सैन्यात असाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज पोर्तुगीज डच ह्यांच्याशी व्यापार करण्याचा विचार केला आणि तलवारी बनवण्याचे सांगितले पण इंग्रज पोर्तुगीज किती धूर्त होते हे आपल्याला इतिहासामधूनच कळते त्यांनी नकार दिला पण एक राज्य स्पेन यांनी मात्र होकार दिला आणि स्वराज्य आणि स्पेन ह्या राज्यातमध्ये तलवारीचा व्यापार सुरु झाला हे सर्व तलवारी आणि इतर शस्त्रे हे स्पेनमधील माद्रिद येथील टोलेडो ह्या गावात बनत असत,तेथून पाती येत असत आणि मग त्यांना मूठ वगरे लावून ह्या तलवारी स्वराज्यात बनत त्यांना मराठा मूठ असली मराठा तलवार असे म्हणण्यात आले.

Toledo as depicted in the Civitates orbis terrarum (1572)

आणि जेव्हा शिवरायांनी तलवारी बनवण्यासाठी स्पेनला निवडले आणि खूप मोठ्या संख्येने शस्त्रात्रे बनवण्यास दिले म्हणून स्पेनच्या राजाने जशी महाराजांना भवानी तलवार भेटली होती तशी रत्नजडित सोन्याची हिरे मानक मोती पाचू  ने जडवलेली उत्तम सुरेख आकर्षक अशी तलवार ह्या व्यापाराच्या बदल्यात भेट म्हणून देण्यात आली हीच ती जगदंबा तलवार आता हि तलवार मात्र भारतात नाही हि तलवार सध्या लंडन मधील रॉयल कलेक्शन मध्ये ठेवण्यात आली आहे ती सुद्धा चुकीच्या नावासह त्यामुळे हि तलवार इंग्लंड कडून भारताला परत दिली जात नाही.

जगदंबा तलवार आता कुठे आहे?

King Edward VII

ब्रिटिश साम्राज्याचा वेल्सचा युवराज राजा एडवर्ड ७वे हा भारताच्या भेटीनिमित्त भारतात आला होता त्याला भेटण्यासाठी भारतातील जेवढे प्रिन्सली स्टेट होते त्या सर्व राजे महाराजणांनी राजा एडवर्डला भेटण्याकरिता आपल्या सोबत मौल्यवान नजराणे घेऊन गेले तसेच मराठा साम्राज्याची करवीर(कोल्हापूर) गादीवर विराजमान असलेले अल्पवयीन राजा शिवाजी ४थे यांच्यासमवेत महादेव वासुदेव बर्वे यांच्योबत ते मुंबई येथे राजा एडवर्डला भेटण्यासाठी १८७५ ला गेले. तेव्हा वेल्सच्या युवराज राजा एडवर्डला शिवाजी ४थे छत्रपती यांनी युवराजला एका रत्नजडित तलवार आणि एक कट्यार या वस्तू भेट म्हणून दिल्या गेल्या ह्यात जी रत्नजडित तलवार होती तीच जगदंबा तलवार होय.तेव्हाचे छत्रपती हे अल्पवयीन असल्या कर्णनाने कपटाने हि तलवार भेट स्वरूपात दिली असावी अशी शक्यता आहे.

Photo Of Chatrapati Shiavji IV (Karveer Gaadi)

 हीच ती तलवार जी अल्पवयीन छत्रपती शिवाजी ४थे यांनी भेट म्हणून हि अमूल्य प्राचीन रत्नजडित तलवार राजा एडवर्डला दिली आणि तो इंग्लंडला जाताना हि तलवार आपल्या सोबत घेऊन गेला.

201 : Jagdamba Sword Of Chatrapati Shivaji Maharaj
Entry Of Sword

हि तलवार लंडन मधील वेस्टमिनिस्टर येथे मार्लबोरोघ राजवाड्यामध्ये द इंडिया रूम येथे ठेवण्यात आले आहेत.ह्या संग्रहालयाचे जे कॅटलॉग आहे त्यात २०१ क्रमांकाचा जो आर्टिकल आहे जी तलवार आहे त्या असे स्पष्ट लिहण्यात आले कि,

महरट्टा; जी युरोपियन सरळ पात्याची असून एकधारी आहे जिच्यावर आयएचएस असे तीनवेळा लिहले गेलेले आहे आणि वजनदार सोन्याच्या नक्षीने बनवलेली आणि त्यात हिरे माणिक मोतीने मढवलेली अशी तलवार कोल्हापूरचे महाराज यांनी भेट म्हणून दिली.

Collection of Indian Arms and Objects of Art
Photo Of Sword Of Chatrapati Shivaji Maharaj

 
ह्या तलवारीवरील प्रत्येक अंगाला नावे दिले गेलेली आहेत ती खालीलप्रमाणे :

Name Of Parts Of Sword


वरील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र सुद्धा रॉयल ब्रिटिश संग्रालयामध्ये आहे ह्यात जी तलवार छत्रपतींनी मागे पकडली आहे हि तलवार आणि लंडनमध्ये असलेल्या तलवारीचे वर्णन हुबेहूब मिळते.

अजून एक फिरंग तलवार ह्या राजवाड्यात आहे काहीजण तिलाच जगदंबा तलवार म्हणून समजत आहे पण ती जगदंबा तलवार नसून फिरंग बनावटीची मराठा मूठ असेलेली तलवार आहे.हि तलवार फिरंगी तलवार म्हणून संद्रीन्घम राजवाडा येथे बॉलरूम मध्ये ठेवली आहे.

Firanghi Sword

फिरंग तलवार सारखी मिळती जुळती अजून एक तलवार आहे तिचं खंडा तलवार राजस्थानमध्ये बनवली जाणारी हि खंडा तलवार आहे.फिरंग तलवारीची मूठ हि खंडा तालवारीसारखीच दिसते त्यामुळे काहींना खंडा तलवारच आपली जगदंबा तलवार आहे असा समज होतो.

Gold Firanghi Sword

वरील दोन्ही तालवारींमध्ये फरक स्पष्ट दिसत आहे कारण जगदंबा तलवार एका महान मराठा साम्रज्याच्या राजाची प्रमुख तलवार आहे.

जगदंबा तालवारीबद्दल माहिती घेत असताना मला एक विडिओ सापडला हा विडिओ श्रीकृष्ण गमरे यांचा असून ते सन २००० साली रॉयल कलेक्शन लंडन येथे भेट दिली होती त्यादरम्यान काढलेला हा तलवारीचा विडिओ इंद्रजीत सावंत यांनी इंटरनेटवर पोस्ट केला आहे.त्या विडिओमधील काही फोटो :

Footage Photo From Shree Krushna Gamare Available By Indrajeet Sawant

आज आपल्याच छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आपल्याला मिळू शकत नाही केवळ त्यांनी ठेवलेल्या चुकीच्या नोंदीमुळे.काही व्यक्तींनी प्रयत्न सुद्धा केले हि तलवार भारतात आणण्यासाठी पण ते निष्फळ ठरले,कारण आपल्याला सांगितलेला खोट्या इतिहासामुळे.आज प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे कि हि तलवार भारतात यावी त्यासाठी वाट्टेल ती रक्कम मोजायला सुद्धा हि प्रजा तयार आहे.आमच्या सारख्या सामान्य लोकांना फक्त एकता ती तलवार डोळे भरून काळीजभरून बघायचीये त्या अमूल्य तेजस्वी असामान्य राजाच्या चरणी नतमस्तक होयचं आहे पण हेही भाग्य आपल्या नशिबी नसावं!

-अभि होलमुखे

वरील माहिती सर्व इतिहासाला धरूनच गोळा करून एक एक कडी जोडून संकलित केली आहे ह्यात जर काही चुका झाल्या असतील तर कृपया लक्षात आणून द्याव्यात योग्य ते बदल केले जातील, धन्यवाद.

References :

Royal Collection Trust,London

Catalogue Of The Collection of Arms and Object of Art

Wikipedia

British Museum

Ranjeet Singh

Namdevrao Jadhav

पोन्झी स्कीम म्हंजे काय रं भाऊ

Ponzi Scheme

आपण कॉलेजमध्ये असताना किंवा आत्तापर्यंत वेगवेगळ्या स्कीम ऐकल्या असतीलच ह्या कंपनीला जॉईन हो एवढे पैसे भेटतील मग तू अजून मित्रांना तुझ्या आय डी वर जॉईन कर येड्या ६ महिन्यात बाईक घेशील आणि आपण त्याला भुलून त्यात पैसे टाकतो आणि नंतर कळत हि कंपनी तर पसार झाली आणि माझे पैसे अडकले तुम्हाला कमी वेळात जास्त व्याजाचे अथवा परताव्याचे एवढे लालच दाखवले जाते कि शकली सावरलेली पोरं ह्यात फसत जातात आपला कष्टाचा पैसे आपल्या आई वडिलांचा पैसे ह्यात लावतात आणि काही वेळाने मात्र पश्चाताप करण्याची वेळ येते.

Charles Ponzi

पोन्झी स्कीम म्हणजे काय तर ज्याने ह्या अश्या स्कीमद्वारे घोटाळा केला फसवणूक केली तो महान जे चार्ल्स पोन्झी चार्ल्स पोन्झीचा जन्महा इटलीमध्ये ३ मार्च १८८२ ला झाला. १९१९ साली तो अमेरिकामध्ये आला आणि एक छोटासा व्यवसाय चालू केला तुम्ही गुंतवलेल्यारकमेवर २ महिन्यामध्ये ५०% नफा असे सांगत त्यांनी लोकांना गंडा घालायला सुरवात केली. १९२० साली त्यांनी बोस्टनमध्ये एक स्टॉक कंपनी चालू केली तिथेसुद्धा त्यांनी मित्रांना तुमच्या गुंतवणुकीमध्ये मी तुम्हाला ९० दिवसात ५०% नफा अथवा गुंतवणूक दुप्पट करूनदेतो त्याने पहिले पोस्टल मेल घोटाळा केला होता त्यातून त्याला ५००% नफा झाला होता, मग त्यांनी छोटे गुंतवणूकदार पकडले आणिपहिल्या गुंतवणूकदारांना व्यवस्थित गुंतवणुकीवर नफा देऊ लागला, पण खरा तो दुसऱ्याचे पैसे पहिल्याला देत होता असे कर एक पूर्णसाखळी तयार होत गेली. अश्या गुंतवणूक ह्या एका पिरॅमिडसारख्या असतात पहिले तळाशी काहीच दिसत नाही अथवा भासत नाही जसजसे वर जाऊ तास तसे अडथळे आणि घोटाळा जाणवू लागतो, ह्यालाच पोन्झी स्कीम म्हणतात जिथे बँक तेव्हा ५% वर्षाला व्याज देत होते तिथे हा भाऊ २ ते ३ महानियत ५०% नफा मिळवून देत होता पण नंतर हा एक घोटाळा असून सामान्य माणसाला मात्र आपले पैसेगमवावे लागले, अश्याच पोन्झी स्कीम भारतामध्येसुद्धा सर्रास चालू आहेत काही पकडल्या गेल्या काही अजून चालू आहेत कुठलीहीकंपनी जर अतिजास्त नफा अथवा परतावा आपल्या गुंतवणुकीवर देत असेल तर समजून जावा हि फसवणूक आहे इतर सर्व सेवा इन्स्टिट्यूशन्स एवढा परतावा देत नसेल तर हे लोक कुठून देणार ह्याची विचारपूस कर पैसे कसे देणार व्यवसायाचे स्वरूप काय विचारपूस करा फक्त मित्र आहे नातेवाईक आहे म्हणून जास्त नफ्याच्या मागे लागून भुलून जाऊ नका कदाचित तुमच्या मित्रालाही ह्याबद्दल काही माहित नसेल तर त्यालाही सावध करा.

Pyramid Scheme

मल्टि लेव्हल मार्केटिंगद्वारे सर्वात जास्त गंडा घातला जातो अशी अनेक उदाहरणे भारतात आहेत पॅनकार्ड क्लब हे उत्तम उदाहरण आहे,पुणे गोवा अश्या अनेक शहरातील पंचतारांकित हॉटेलच्या स्कीमच्या नावे पॅनकार्ड क्लब्सने लोकांकडून पैसे घेतले कमी दिवसात जास्त परतावा देण्याच्या नावाने लोकांनी हजारो तर काहींनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आणि आता कोणाचाही एक रुपया परत मिळालेला नाही.

सहारा सारख्या कंपनीने लाखो गरीब शेतकरी मजदूर लोकांना फसवले आहे.सध्या वेस्टिज ऑसमॉस सारख्या कंपन्या आहेत त्या आता गावात आपले पाय रुजवात पोरं त्यात कर्जाने पैसे घेऊन त्यात गुंतवणूक करत आहेत.

आता हे सर्व जुनं झालं आहे आता सर्व डिजिटल झाल्यामुळे फ्रॉडपण डिजिटलमध्येच होणार आता नेटवर्क मार्केटिंग आणि सगळ्यातचर्चेत असणारं म्हणजे क्रिप्टोकरंसी बिटकॉइन इथेरियम वगरे ह्यात फ्रॉड जास्त होत आहेत आहेत झाले आहेत आणि आत्ताच्या वेळेला होत आहेत

शेवटी काय आहे आपल्याला कोण जर कमी वेळात आपल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा रिटर्न्स देत असेल तर पहिले नीट चौकशी करा इतका हि जमत नसेल तर सरळ सरळ इच्छूक नाही म्हणून सांगा.अश्या पॉन्झी स्कीम्स घोटाळे,फसव्या स्कीम्स ह्या देशात होताच राहणार त्यासाठी प्रत्येकाने आर्थिक साक्षर होण्याची गरज आहे.

-अभि होलमुखे

पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज

आज वेगळ्या मुद्द्यावर लिहण्याचा प्रयत्न करतोय, पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज आणि पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिंड्रोम हे काय आहे ते जाणून घेऊया. तर हिंदू ह्या एका वृत्तपत्रानुसार पाच भारतीय स्त्री मधील एक स्त्री हि ह्या पीसीओएस ह्या ग्रस्त आहे.ह्या रोगाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे.भारतासारख्या देशात ह्या विषयावर मुक्तपणे इतका काही बोलले जात नाही त्यामुळे ह्याबद्दलच्या अंधश्रद्धाही खूप आहेत तर जाणून घेऊया काय आहे पीसीओडी आणि पीसीओएस.

पीसीओडी (पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज)

स्त्रीच्या शरीरातील सर्वात मुख्य अवयव म्हणजे स्तन आणि योनी आणि आत्ताच्या काळात सगळ्यात जास्त समस्या उदभवत आहेत त्या गर्भधारणेच्या,आजचे हे बदलते जग तसेच बदलती जीवनशैली सुद्धा काहीप्रमाणे ह्याला जबाबदार आहे.एखादी स्त्री गर्भधारण करू शकत नसेल तर तिच्याकडे समाज हा कश्या आणि कोणत्या नजरेने पाहतो हे तुम्हाला माहीतच आहे.आणि त्यामुळे नैराश्य येणे मन विचलित राहणे हे होत असतं तेव्हा मनाचा ताबा आणि जिद्ध हीच कामी येते आणि परिवाराचा आधार हा खूप मोठी भूमिका बजावतो.

तर बऱ्याचदा महिलांना/मुलींना मासिकपाली अनियमित होत असेल तर त्याचे कारण पिसिओडी असू शकते.पीसीओडीमध्ये स्त्रियांच्या अंडाशयामध्ये गाठी तयार होतात,सिस्ट तयार होतात.अंडाशयातील तयार होणाऱ्या गाठी त्यामुळे महिलेचे स्त्रीबीज तयार होण्यास अडथळे निर्माण होतात.पीसीओडीमुळे स्त्रियांच्या हार्मोन्समधील बॅलन्स बिघडतो आणि मग त्यांना हार्मोनल असंतुलनाला सामोरे जावे लागते.साधारण पीसीओडी होणे म्हणजे वंधत्व येणे असे समजले जाते,आपल्या समाजात मूल न होणे असे समजले जाते.

प्रत्येक शारीरिक त्रासावर जर वेळीच उपचार घेतले तर तो आजार लवकर बरा होतो पण वेळीच न कळल्यास अथवा कळत असून त्यावर वेळीस उपचार न कल्यास मात्र पुढे ह्याचा अनाहक त्रास सहन करावा लागतो,तसे खूप उशीर झाल्यास ह्याचे परिणामसुद्धा भयंकर उध्दभवू शकतात.

◉ पीसीओडी होण्यामागची लक्षणे

❖अचानक वजन वाढणे

पीसीओडी असल्यास मुलींचे अचानक वजन वाढू लागते तसेच पोटाचा घेर हा जास्त वाटू लागतो हा त्रास अनेक स्त्रियांना होत आहे पण त्यावर दुर्लक्ष केलं जात आहे.

❖अनियमित मासिक पाळी (Irregular Menstrual Cycle)

दर महिन्याला स्त्रियांच्या गर्भाशयामधून एक परिपक्व झालेले स्त्रीबीज (Ovum) बाहेर पडत असते.यालाच मासिक पाळी म्हणतात.पण पीसीओडीमुळे तर स्त्रीबीज तयार होण्यास अडथळे निर्माण होत असल्या कारणाने मासिक पाळीची समस्या निर्माण होते,त्यामुळे मासिक पाळी येण्यास उशीर होतो तसेच अपुरा रक्तस्राव होतो.

❖मासिकपाळी दरम्यान खूप वेदना होणे

पीसीओडीमुळे स्त्रियांच्या अंडाशयात जे सिस्ट म्हणजे गाठी तयार होतात त्यामुळे असह्य वेदना जाणवू लागतात.तुम्हाला तर रेगुलर मासिकपाळी पेक्षा जास्त त्रास होत असेल तर लगेच तपासणी करून घ्या.

❖डोकेदुखी

हार्मोनल चेंजेस मुळे तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये बदल होत असतात त्यामुळे पीसीओडीमुळे डोकेदुखी होत असते तर काहीजणींना जास्त डोकेदुखी होते.

❖वंधत्व

पीसीओडीचे प्रमुख कारण हेच आहे,गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी ओव्हुलेशन म्हणजेच बीजकोश फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया होणे गरजेचे असते परंतु अंडाशयामध्ये गाठी निर्माण होत असल्यामुळे ह्या क्रियेमध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे स्त्रियांना वंधत्वला सामोरे जावे लागते.त्यामुळे ‘आई’ होण्याला फुल्ल स्टॉप लागतो.

❖केस गळणे,चेहऱ्यावर केस येणे

हार्मोनल चेंजेसचा फटका केसांवरसुद्धा बसतो केसांचे पोषण न झाल्यामुळे ते कोरडे दिसायला लागतात त्यामुळे खूप प्रमाणात हेअर लॉस होतो आणि चेहऱ्यावर डाग येतात आणि एकदम छोटे केस दिसू लागतात

◉ पीसीओडी होण्यामागची कारणे

❖जीवनशैली

आजकालची जगण्याची पद्धती तुम्हाला माहीतच आहे.ताण-तणाव,कौटुंबिक समस्या,भांडणे,मुलींचे काही प्रेम प्रकारातील ताण-तणाव असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे हि समस्या उध्दभवू शकते.

❖चुकीचा आहार

आहार हा शरीराला ऊर्जा देणारा महत्वाचा घटक उत्तम आहार म्हणजे आजारपणाला राम राम असे आपले आजी आजोबा सांगत असतात त्याचे प्रमुख कारण हेच उत्तम आहार तुम्हाला अनेक रोग-आजार ह्यांपासून लांब ठेवतो आजकाल जंक फूड असेल बाहेरचे जेवण ह्यावर अधिक भर पडताना दिसत आहे त्यामुळे पीसीओडी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

❖अनुवांशिक

खूप ठिकाणी ह्याचा संदर्भ मी पाहत होतो पीसीओडी हि अनुवांशिक समस्या असू शकते ह्यावर माझा लगेच काही विश्वास बसत नव्हता पण अभ्यास करता हि समस्या अनुवांशिक सुद्धा आहे हे लक्षात आले जर तुमच्या आई किव्हा बहिणीला हि समस्या असेल तर ती तुम्हालाही होऊ शकते असे काही ठोस नाही को त्यांना झाला म्हणजे तुम्हालाही होईलच.

❖व्यायामाची कमी

वजन हि एक पप्रमुख कारण असू शकते असे मला वाटत आहे जे मी स्वतः पाहिलेली उदाहरणे आहेत त्यावरून वजन जास्त किव्हा खूप कमी ह्यामुळे सुद्धा हि समस्या निर्माण होऊ शकते.

◉ पीसीओडी आणि पीसीओएस बद्दलचे गैरसमज

जर तुम्हाला पिकोस असेल आणि तुमचे वजन जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.ना कि  मधुमेहामुळे पिकोस,पीसीओडी होतो.

मलाच स्वतःला हा गैरसमज होता कि जास्त वजन असणाऱ्यांच स्त्रियांना हा आजार होतो पण तसे नाही बारीक शरीर कमी वजन असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा हि समस्या उध्दभवू शकते

कधी कधी स्कॅनमध्ये ओव्हरी सिस्ट हे दिसून येत नाही त्यामुळे अनेकांना वाटतं कि आपल्याला हि समस्या नाही परंतु तसे नाही जर अनियमित पाळी आणि इतर लक्षणे असल्यास योग्य ती टेस्ट करणे गरजेचे आहे.

◉ पीसीओडी,पीसीओएस हे कळण्यासाठी खालील टेस्ट उपयोगी पडतात

❖ट्रांसवेजिनल स्कॅन (Transvaginal Scan)

ट्रांसवेजिनल स्कॅन म्हणजे योनीच्या आतमधील स्कॅन करून त्याचे परीक्षण करणे.तज्ज्ञांच्या मते हा खतरेशीर उपाय आहे ह्या समस्येसाठी ह्यामध्ये गर्भाशय,अंडाशय संपूर्ण योनी यांचे व्यवस्थितरीत्या परीक्षण करता येते जेणेकरून सांगता येते कि तुम्हाला जी लक्षणे दिसत आहे त्यामुळे तुम्हाला पिकॉस अथवा पीसीओडी आहे कि नाही.

❖Hormonal Assay Test

जर हार्मोनल बदल होत असतील,मासिक पाळी वेळेवर येत नसेल मासिक पाली दरम्यान वेदना होत असतील तसेच रक्तस्राव होत असेल तर हि टेस्ट करणे उपयुक्त ठरू शकते.

❖follicle(बीजकोष) scan

ह्या स्कॅनद्वारे बीजकोष तयार होत आहेत कि नाही ते समजते जर ते आढळ्यास त्यावर औषध देऊन त्यावर निदान केले जाते.

❖लॅप्रोस्कोपिक ओवेरियन ड्रिलिंग (एलओ डी)

पीसीओएस मुळे वंध्यत्व येऊ शकते त्यामुळे , गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास लॅप्रोस्कोपिक ओवेरियन ड्रिलिंग (एलओ डी) ची छोटी शस्त्रक्रिया केली जाते. जो टिश्यू अँड्रोजेन (पुरुष संप्रेरक) निर्मितीस कारणीभूत असतो त्यावर उष्णतेची किंवा लेसर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे संप्रेरकांची पातळी नियमित होण्यास मदत होते आणि अंडाशयाचे कार्य सुरळीत होऊन गर्भधारणेस मदत होते.

पीसीओएस किव्हा पीसीओडी जे जर एखाद्या स्त्रीला झाले तर तीला बाळ होऊ शकते का? ह्या प्रश्नाने मात्र खूप मुलींच्या मनात घर केले आहे. तर हा पीसीओएस जरी असेल तरी तुम्ही बाळाला जन्म देऊ शकता पण ते फक्त औषधामुळेच होऊ शकतो हे असे नाही त्यात तुमचीसुद्धा शारीरिक आणि मानसिक तयारी करणे गरजेचे आहे,व्यवस्थित आहार,उत्तम जीवनशैली,आणि व्यायाम हेसुद्धा तितकेच गरजेचे आहे जितक औषधे. जर तुम्हाला पीसीओएस असेल आणि तुम्हाला गर्भधारणा झाली असेल तर तुम्हाला इतर स्त्रियांपेक्षा गर्भपाताचा धोका हा तीनपट जास्त असतो,म्हणजे तुम्हीच विचार करा किती काळजी घ्यावी लागत असेल. पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रीला नियमित व्यायामाची गरज असते.

हलके व्यायाम केल्याने इन्सुलिनचा वापर शरीर करू लागते, त्यामुळे संप्रेरकांचे संतुलन होते आणि वजन नियंत्रित राहते. पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रियांसाठी सिझेरिअन प्रसूतीला प्राधान्य दिले जाते. कारण आईला जर पीसीओएस असेल तर गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत खूप वाढते आणि सी सेक्शन प्रसूतीदरम्यान काही समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.पीसीओएस असताना गर्भधारणा होणे हे अशक्य नाही, परंतु पीसीओएस असताना गर्भधारणा होणे नक्कीच थोडे अवघड आहे.

व्हिस्की : एक कला

दारू हा शब्द कोणी उच्चारला कि त्याकडे सगळे तिरकस नजरेने पाहतात.पण हीच ज्याला आत्ता दारू म्हणतात ती भारतामध्ये खूप पूर्वीपासून त्याचे सेवन केले जाते अगदी आदिवासी सुद्धा त्यांचं तर पेयच आहे ते.जो तो आपापल्या पद्धतीने ज्याला जमेल तसं मद्येच सेवन करतो कोणी बिअर तर कोणी व्हिस्की तर कोणी वाईन कोणी रम तर कोणी वोडका. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग जगात सर्वात जास्त मद्य कुठले पिले जाते तर ते म्हणजे व्हिस्की.व्हिस्की बनवणे हि एक कला आहे,हे दिसतंय तितका सोपे नाही खूप मेहनत,कला गुणांनी एक व्हिस्की चांगली व्हिस्की तयार केली जाते.पण त्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत आणि बनवण्याची अनोख्या पद्धती आहेत.आपण आज पाहूया व्हिस्की कशी तयार केली जाते आणि त्यांचे प्रकार किती.

त्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे :

डिस्टिलरी : डिस्टिलरी म्हणजे जिथे व्हिस्की बनते त्याचा कारखाना जिथे व्हिस्की 10,15,25 वर्षे एज केली जाते.

The Glenlivlet Distillery

मास्टर ब्लेंडर : ब्लेंड म्हणजे मिश्रण करणे,एक व्हिस्की तयार करण्यासाठी जेव्हा वेगवेगळ्या व्हिस्की एकत्र करून एक व्हिस्की तयार करण्यात येते.पण तिची चव तशीच ठेवण्यासाठी तिला योग्य प्रमाणामध्ये मिश्रित करणे गरजेचे असते मग इथे येतो एक जादूगार म्हणजे मास्टर ब्लेंडर तो योग्य त्या प्रमाणात प्रत्येक व्हिस्की एकत्र करून त्याच चवीची व्हिस्की तयार करतो.

Master Blender

बार्ली : बार्ली म्हणजे जव जी मादक पेय तयार करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक पदार्थ आहे.

Barley

व्हिस्की बनवतात कशी ते आपण पाहू ह्यामध्ये आपण स्कॉच व्हिस्की चा प्रकार घेऊ स्कॉच व्हिस्की बनवण्यासाठी बार्ली,यीस्ट आणि पाणी.साधारण सर्वच डिस्टिलरी ह्या पाण्यावर खूप जोर असतो म्हणतात कि जर पाण्यात फरक पडला तर व्हिस्की च्या चवीमध्ये सुद्धा फरक पडतो आणि व्हिस्कीसाठी वापरण्यात आलेले पाणी हे स्वच्छ आणि शुद्ध असणे गरजेचे आहे.त्यासाठी कंपन्यांनी पाण्याचे नैसर्गिक साठेचं घेतलेले आहेत.स्कॉचमध्ये अजून एक घटकाचा वापर होतो तो म्हणजे पीट.पीट हा एक अर्धवट कुजलेल्या वनस्पतींपासून बनलेला एक थर असतो.व्हिस्की तयार करण्यासाठी पहिले बार्ली भिजवून जमिनीवर पसरवतात,हळूहळू त्यावर रासायनिक प्रक्रिया होते त्यालाच मॉल्टिंग म्हणतात.ह्या मॉलटिंगला हवामान नुसार वेळ लागतो.मग हे बार्ली आगीवर ठेवतात आणि ती आग पिटच्या साहाय्याने लावलेली असते जेणेकरून स्कॉचमध्ये एक वेगळा सुगंध येतो.

Diageo Distillery

बार्ली भाजल्यानंतर बार्लीचे पीठ तयार करतात आणि ह्या पिठामध्ये पाणी मिसळतात.आणि हे मिश्रण त्यांच्या ठरलेल्या तापमानावर गरम करतात.मग त्यातून एक गोड द्रवपदार्थ तयार होतो.त्यानंतर ह्या गोड पदार्थाला एका विशिष्ट डिग्रीपर्यंत गार केला जातो.आणि मग ह्यात यीस्ट मिसळले जाते.आणि मग इथून अल्कोहोल तयार होण्याची सुरवात होते.त्यानंतर अल्कोहोल पाण्यापासून वेगळं करतात त्याला म्हणतात डिस्टिलेशन.मग ते अल्कोहोल एजिंग साठी ओक च्या बॅरलमध्ये कमीतकमी 3 वर्षे ठेवतात.

Jack Daniels Distillery Oak Barrels

व्हिस्की हि प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळी तयार केली जाते.पाहूया मग व्हिस्कीचे प्रकार

स्कॉच व्हिस्की

Johnnie Walker Scotch Whiskey

खूप जणांना माहिती नाही कि स्कॉच व्हिस्की म्हणजे काय तर स्कॉच व्हिस्की म्हणजे जी व्हिस्की स्कॉटलँड मध्ये तयार केली जाते,त्या देशातील व्हिस्की तयार करण्याचे सर्व मापदंड वापरून तयार करण्यात आलेली व्हिस्की म्हणजे स्कॉच व्हिस्की,हि व्हिस्की फक्त मॉल्टेड बार्ली आणि ग्रेन्स पासून तयार केली जाते.सर्व स्कॉच व्हिस्की ह्या कमीतकमी 3 वर्षे एज केलेल्या पाहिजे.हा तिथल्या देशाचा नियम आहे आणि त्या बाटलीवर किती वर्षे एज केली आहे ते लिहणे बंधनकारक आहे.

बर्बन व्हिस्की

JIM BEAM Bourbon Whisky

बर्बन व्हिस्की हि अमेरिकन व्हिस्की म्हणजे हि व्हिस्की अमेरिकेमध्ये तयार केली जाते.तुम्हाला जर बर्बन व्हिस्की बनवायची असेल तर तुम्हाला अमेरिकेमध्येच तयार करावी लागते आणि सगळ्यात जास्त बर्बन व्हिस्की हि केंटकी मध्ये बनते.ह्यामध्ये जे घटक वापरले जातात त्यामध्ये 51% हे कॉर्न म्हणजे मका पाहिजे हे अनिवार्य आहे आणि कमीतकमी 40% अल्कोहोल असणे गरजेचे आहे.बर्बन व्हिस्कीसाठी एज करण्याचे काही बंधन नाही तुम्ही 3 महिने एज करून सुद्धा बर्बन व्हिस्की विकू शकता.ह्यामध्ये अजून एक प्रकार आहे स्ट्रेट बर्बन व्हिस्की त्यासाठी व्हिस्की हि ओक बॅरल मध्ये कमीतकमी 2 वर्षे एज करणे अनिवार्य आहे आणि ह्यामध्ये कोणताही फ्लेवर व्हिस्की मध्ये टाकायचा नसतो जशी आहे तशी त्यांना बाटलीमध्ये पॅक करावी लागते.

टेनेसी व्हिस्की

Jack Daniels Tennessee Whisky

टेनेसी व्हिस्की हि अमेरिकन व्हिस्की आहे हि व्हिस्की फक्त आणि फक्त अमेरिकेतल्या टेनेसी ह्या राज्यात बनवावी लागते.हि व्हिस्की लिंकन काउंटी प्रोसेसद्वारे बनवली जाते.जॅक डॅनिएल्स हि जगातील सर्वात प्रसिद्ध आणि नामांकित व्हिस्की आहे.

आयरिश व्हिस्की

JAMESON IRISH WHISKEY

आयरिश व्हिस्की हि आयर्लंड मध्ये तयार केली जाते.आयरिश व्हिस्की हि बनवली जाते मॉल्टेड बार्ली,अनमॉल्टेड बार्ली आणि धान्यापासून ह्या तिन्ही घटकापासून आयरिश व्हिस्की बनवली जाते.हि व्हिस्की खूप स्मूथ असते.भारतामध्ये सध्या आयरिश व्हिस्की पिण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

इंडियन व्हिस्की

Blenders Pride Indian Whisky

हि आपल्या प्रिय भारत देशात बनवली जाते.इंडियन व्हिस्की बनवायला असं काही निश्चित घटक वापरणे बंधनकारक नाही तुम्ही काहीही वापरू शकता,मग ती मॉल्टेड बार्ली असेल धान्य असेल मका असेल,ऊस वा अजूनकाही पण भारतात जी व्हिस्की तयार केली जाते ती जास्तकरून मोलासीस म्हणजे मळी उसाची मळीपासून तयार केली जाते.भारतात जी व्हिस्की बनवली जाते त्याला परदेशात रममध्ये पकडले जाते.भारतामध्ये ती व्हिस्की आहे पण परदेशात मात्र रम मध्ये कारण आहे मोलासीस.भारतामध्ये बनवलेल्या व्हिस्कीला अस काही निश्चित वेळेसाठी एज म्हणजे म्यॅच्युर करणे गरजेचे नाही.भारतामध्ये असे काही विशिष्ट पद्धती नाही व्हिस्की बनवण्याबद्दल त्यामुळे कंपनीला दोष देऊ नका.

सिंगल मॉल्ट व्हिस्की

Single Malt Scotch Whiskey

सिंगल मॉल्ट व्हिस्की म्हणजे जी व्हिस्की एकाच डिस्टिलरी मधून बनवली जाते ज्यात मुख्य घटक हा  मॉल्टेड बार्ली असतो.ह्यामध्ये वेगवेगळ्या बॅरल मधून सुद्धा व्हिस्की एकत्र करतात त्याला ब्लेंड असं म्हणतात पण त्या सर्व बॅरल हे त्या एकाच डिस्टिलरी मधले असले पाहिजे.उदाहरण घेऊन समजूया आपण एक ब्रँड आहे ग्लेनलिवेट व्हिस्की आता हि व्हिस्की जेव्हा बनते तेव्हा ग्लेनलिवेट जो कारखाना आहे जी डिस्टिलरी आहे तिथले वेगवेगळे जे बॅरल आहेत ते एकत्र करून म्हणजे ब्लेंड करून एक सिंगल मॉल्ट व्हिस्की तयार केली जाते असे का तर त्याची जी चव आहे जी टेस्ट आहे ती अबाधित राखण्यासाठी असे केले जाते तुम्ही जर एकाच व्हिस्की पित असाल तर तुम्हाला जाणवेल कि चव नेहमी सारखीच असते.आणि जो हे सर्व वेगवेगळ्या बॅरलमधल्या व्हिस्की एकत्र आणून एकच एकसारखी चव असलेली व्हिस्की बनवतो त्याला म्हणतात मास्टर ब्लेंडर.आता कळलं का व्हिस्की बनवने हि सुद्धा एक कला आहे.व्हिस्की जेव्हा ब्लेंड केली जाते त्यानंतर तिला ओक बॅरल मध्ये एज केली जाते म्हणजे त्या व्हिस्की ला त्या बॅरल मध्ये 15 वर्षे ठेवली जाते.सिंगल मॉल्ट व्हिस्की हि महाग असते कारण ती कमी प्रमाणात बनवली जाते.

India’s First Single Malt Whisky

अमृत डिस्टिलरी हि भारतातील सर्वात पहिली सिंगल मॉल्टेड व्हिस्की आहे.अमृत डिस्टिलरी ची सुरवात बँगलोर येथे जेएन राधाकृष्णराव जगदाळे यांनी केली.

सिंगल बॅरल स्कॉच व्हिस्की

Single Barrel Scotch Whisky

सिंगल बॅरल स्कॉच व्हिस्की हि सिंगल मॉल्ट व्हिस्की प्रमाणेच बनवली जाते.फक्त हि ब्लेंडेड नसते म्हणजे ती एकाच डिस्टिलरी मधून आणि एकाच बॅरल मधून तयार केली जाते.हि सिंगल मॉल्ट व्हिस्की पेक्षाही महाग असते.ह्यांच्यामध्ये त्या व्हिस्कीची चव हि सारखी नसते म्हणजे आज जो बॅरल आहे तो संपला आणि दुसरा बॅरल घेतला तर दोन्ही बॅरल मधल्या व्हिस्की ची चव हि वेगळी असते फ्लेवर वेगळा असतो.

ब्लेंडेड मॉल्ट व्हिस्की

Blended Malt Whisky

ब्लेंडेड मॉल्ट व्हिस्की म्हणजे एक डिस्टिलरी जी सिंगल मॉल्ट व्हिस्की बनवते ती काय करते तर वेगवेगळ्या सिंगल मॉल्ट डिस्टिलरीमधून व्हिस्की घेते आणि त्याला ब्लेंड करून व्हिस्की बनवते.

ब्लेंडेड व्हिस्की

ब्लेंडेड व्हिस्की म्हणजे सगळयांच्या आवडीची आणि परवडणारी आणि जगात सर्वात जास्त पिली जाणारी म्हणजे ब्लेंडेड व्हिस्की.ह्या व्हिस्की मध्ये काय होत कि एक डिस्टिलरी जी व्हिस्की बनवते ती वेगवेगळ्या डिस्टिलरीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्की एकत्र करते म्हणजे ब्लेंड करते आणि एक व्हिस्की तयार होते.

वॅटेड मॉल्ट व्हिस्की

Vatted Malt Whisky

दोन वेगळ्या सिंगल मॉल्ट व्हिस्कीला एकत्र करून ब्लेंड करून बनवली जाते वॅटेड मॉल्ट व्हिस्की.दोन्ही व्हिस्की ह्या मॉल्टेड बार्लीपासून तयार केलेले व्हिस्की असतात.

ब्लेंडेड ग्रेन्स स्कॉच व्हिस्की

Blended Grain Whisky

हि एक ग्रेन व्हिस्की आहे जी फक्त स्कॉटलँड मध्ये तयार केली जाते.म्हणजे धान्यापासून तयार केलेली व्हिस्की आहे.ह्यात सिंगल डिस्टिलरी मधून नाही तर वेगवेळ्या डिस्टिलरी मधून व्हिस्की आणून ब्लेंड करून एक ग्रेन व्हिस्की तयार केली जाते.

2011 साली ऑफिसर चॉईस ह्या निरामध्ये असलेल्या डिस्टलरी मध्ये जाण्याचा योग मला आला होता.व्हिस्की कशी बनते अगदी कच्च्या माल आणण्यापासून पासून बॉटलिंग करेपर्यंत मी सर्व प्रक्रिया मी पहिली.त्या दिवसापासून मी व्हिस्कीबद्दलची माहिती मी घेत असतो.खरंच! व्हिस्की बनवणे हि कला आहे.
मी माझ्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.तरी काही चुकले असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.
– अभि होलमुखे

क्रिप्टोकरन्सी : भविष्यातील चलन

Cryptocurrency : future currency

संपूर्ण जगात सध्या कोरोना नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे.चीनमधून सर्वत्र विश्वात पसरलेला हा कोरोना विषाणू दिवसाला अनेक लोकांचे जीव घेत असतानाच एक बातमी आली चीनच्या सेंट्रल बँकने डिजिटल करन्सी DCEP चे परीक्षण करण्यास सुरवात केली आहे.पण काय आहे हि डिजिटल पैसे बघुयात.

Satoshi Nakamoto

2009 साली सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन ची संकल्पना आणली.पण ह्यात गंमत अशी आहे कि ह्या करन्सीला बँकेबरोबर राहण्याची गरज नसते,कुठल्याही सीमेचे बंधन नसते,बँकांचा आणि देशाचा संबंध नसल्यामुळे त्यावर कुठला कर नसतो.ह्यावर कोणाचे नियंत्रण नसते झटक्यात ह्याचा भाव गगनाला भिडतो तर क्षणार्थात जमिनीवर कोसळतो.ह्या क्रिप्टोकरन्सी चा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे.ह्या क्रिप्टोकरन्सीची उलाढाल आता अब्जावधी डॉलरमध्ये पोहचली आहे.2019 मध्ये सुद्धा बिटकॉइन हे नाव चर्चेत आलं होत कारण होतं त्याचे मूल्य मेच्या दरम्यान एका बिटकॉइनची किंमत हि 9000 डॉलर इतकी झाली आणि आत्ता बिटकॉइनचे मूल्य 8023.59 डॉलर इतके आहे.म्हणजे रुपयांमध्ये एका बिटकॉइनचे मूल्य हे 3 लाख 60 हजार इतके होते.

Current Value Of Bitcoin

क्रिप्टोकरन्सीला अनेक देशातून मान्यता मिळाली नाही तर असेसुद्धा देश आहेत जिथे बिटकॉइन सारखी क्रिप्टोकरन्सीने व्यवहार चालू आहेत.भारतासारख्या देशात हि क्रिप्टोकरन्सी कायद्याच्या चौकटीत बसत नाही.म्हणून भारताने ह्यावर बंदी घातली होती पण ती बंदी उठवली आहे.

अनेकांना बिटकॉइन माहिती असेल बिटकॉइन हि क्रिप्टोकरन्सी आहे, क्रिप्टोकरन्सी म्हणजे कॉम्प्युटरच्या अल्गोरिदमघ्या साहाय्याने तयार करण्यात आलेली करन्सी आहे खूप जणांना हे वाटत आहे पण ते तसे आहे का? तर  क्रिप्टोकरन्सी हि अल्गोरिदम नसून डिजिटल करन्सी आहे हि करन्सी तयार करण्यामागे जे तंत्रज्ञान आहे त्याला म्हणतात ब्लॉकचेन हे अल्गोरिदम नसून एक सॉफ्टवेअर डिसाईन आहे.आपण ज्या नोटा वापरतो ते आपल्याला दिसत असतात त्यांना भौतिक अस्तित्व असते त्यामुळे व्यवहार सहजरित्या होतात पण इथे तसं नाही कारण क्रिप्टोकरन्सीला भौतिक अस्तित्वच नाही तसेच देशात किती नोटा छापल्या आहेत ह्याची सर्व माहिती हि आपल्या भारतीय रिसर्व बँकेत असते पण  क्रिप्टोकरन्सीबाबत सगळी माहिती कुठे ठेवणार कारण क्रिप्टोकरन्सीला कोणी केंद्रीय संस्थाच नाही आता ज्याला आपण करन्सी देतोय आणि जो ती हि करन्सी घेतोय ह्याची नोंदणी दोघांकडे असली पाहिजे. आता ह्यावर उपाय काढला पाहिजे यासाठी सातोशी नकोमोटो यांनी यावर उपाय सुचवला ब्लॉकचेन! ब्लॉकचेन म्हणजे Decentralized Network म्हणजे विकेंद्रित जाळ प्रत्येकाने प्रत्येक बिटकॉइनचा हिशोब ठेवायचा 2 जणांमध्ये व्यवहार झाला आहे त्या व्यवहारात तुमचा संबंध असो वा नसो तुम्हाला त्याची नोंद ठेवावी लागणार असं नाही कळणार माहिती मला उदा. समजा 50 जणांचे नेटवर्क आहे आणि मला दुसऱ्याबरोबर तो व्यवहार करायचा आहे यासाठी त्याला ह्या नेटवर्कचा हिस्सा बनायला लागेल म्हणजे आता झाले 51 मी त्याला 5 करन्सी दिले आणि तसं मी माझ्या वहीमध्ये लिहून ठेवले त्यामुळे काय होईल माझ्यातून 5 करन्सी गेले आणि दुसऱ्याच्या वहीत नोंद होईल त्याकडे 5 करन्सी आले मग हि नोंद मी एका डेटाच्या बॉक्समध्ये टाकेन आणि मी ते प्रत्येकाला पाठवेन,आता हे होणार सगळं नेटवर्क मध्ये सगळं होणार  जिथे कॉम्पुटर आणि इंटरनेट तिथे हॅकिंग आली ह्यामधून कोणी मध्येच हॅक करून गडबड केली किव्हा बिटकॉइन चोरले तर मधल्यामधी कोणी येऊन हॅक करू नये यासाठी वापरण्यात येते एन्क्रिप्शन की तो जो बॉक्स असतो त्याला एन्क्रिप्शन कीने एन्क्रिप्ट करून पाठवले जाते.हेच आहे ब्लॉकचेन तसं हे अजून खोलात आहे पण ते थोडा किचकट आहे.

Bitcoin Mining Process

आता प्रश्न हा आहे कि हे सगळं तयार कसे होतात तर बिटकॉइन तयार करण्याच्या प्रक्रियेला म्हणतात मायनिंग! कॉम्पुटरद्वारे ह्या अल्गोरिदम आणि सॉफ्टवेअरच्या साहाय्याने बिटकॉइनचे मायनिंग होत असते हे खूप क्लीष्ट आणि वेळ घेणारे आहे ह्यासाठी तुम्हाला महागडे GPU लागतात.फेसबुकने लिब्रा नावाची ब्लॉकचेन डिजिटल करन्सी बाजारात उतरवत आहे.डिजिटल करन्सी हीच भविष्याची करन्सी असू शकेल का हे आता पाहावे लागेल.ब्लॉकचेनने व्यवहार अतिशय गोपनीय पद्धतीने होतो आणि ह्यात भ्रष्टाचार होत नाही.भविष्यासाठी क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल करन्सी महत्वपूर्ण असेल ह्यात तिळमात्र शंका नाही.

– अभि होलमुखे

कोरोना विषाणू हे जैविक हत्यार आहे का?

सगळीकडे सगळ्या देशात एकच चर्चा आहे कि चीनने कोरोना व्हायरस बनवला आहे.त्यांनी हा व्हायरस त्यांच्या वूहान इथल्या लॅब मधून तयार केला आहे.आपण बघूया कि चीनने कोरोना तयार केला आहे का तेपण एच आय व्ही च्या नमुन्यापासून त्याला मिश्रित करून कोरोना तयार केला गेला आहे का?

सगळ्यात पहिले आल्याला जाणून घ्यावे लागेल कि जैविक युद्ध (Biological Warfare) म्हणजे काय? तर जैविक युद्धामध्ये जिवंत जीवजंतू विषाणू आणि त्यांच्या उत्पादित पदार्थांचा उपयोग केला जातो.तर हे विषाणू आहेत ह्यांचा माणसाला मारण्यासाठी वापर केला जातो.दुसऱ्या विश्वयुद्धात ह्या विषाणूंचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.नंतर ह्यावर बंदी घातली गेली आहे,तसा करारच केला गेला आहे.हा करार 26 मार्च 1975 पासून प्रभावी करण्यात आला.ह्या करारावर 178 देशांनी स्वाक्षरी केल्या आहेत,ह्या करारानुसार कुठल्याही देशाने हे विषाणू जिवाणू यांचा साठा,विकसन,निर्माण करण्याची हमी दिली आहे.हे झालं जैविक युद्धाबद्दल आता येऊया चीन कडे चीन काय देश आहे सगळ्यांना माहिती त्यांनी कसा जगापासून स्वतःला लपवून ठेवलं आहे त्यांनी स्वतःला कसे सायबर सुरक्षेमध्ये ठेवलं आहे.चीनमध्ये 1949 पासून कम्युनिस्ट पार्टी आहे.तीच सत्तेत आहे.आत्ताचे त्यांचे राष्ट्रपती हे ची जिंगपिंग आहेत त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं अथवा आवाज उठवला तर त्याला गायब केलं जातं,हे होत आलंय.

Ban or Blocked Sites By China

चीनमध्ये गुगल,फेसबुक,बीबीसी,अश्या अनेक इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना बंदी आहे.चीनचं स्वतःच सर्च इंजिन आहे.त्यांचा स्वतःच युट्युब सारखा एप्लिकेशन आहे.तिथे व्हाट्सअँप ला बंदी आहे त्यासाठी त्यांचा स्वतःच वी चॅट आहे.तिथे प्रिंट मीडिया सेन्सॉर आहे आणि तिथे त्यांचीच भाषा अनिर्वाय आहे.तुम्हाला जर आठवत असेल ना तर एम आय हि कंपनी जी मोबाईल बनवते त्यात पहिले प्ले स्टोअर नसायचं तर का कि ते गुगल चं आहे आणि तिथे गुगलला बंदी आहे.कमी शब्दात काय तर चीन हे आपल्या इथे काही झालं ततर ते लपवते.आता येऊया कोरोना वर आत्ता मी जेव्हा हे लिहतोय कोरोना चे जगभरात 8,73,767 इतक्या रुग्णांची पुष्टी झाली आहे तर 43,288 इतक्या लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.आता हि वैश्विक महामारी म्हणून घोषित केली गेली आहे.

कोरोना विषाणू हि चीनची देन आहे,चीनने बायो वेपन तयार केले आहे कासगळ्यात पहिली अफवा काय आहे चीन ने कोरोनाला लॅब मध्ये बनवलं,Wuhan Institute of Virology (WIV) इथून हा व्हायरस पसरला.इथून याला तयार केलं गेलं म्हणजे Genetically Engineered केलं गेल,आणि त्याला मार्केट मध्ये सोडून दिलं त्यात अम्ब्रेला कॉर्प ह्यात सामील आहे.तर का कि सगळे झॉम्बी होतील आणि लोकं मारतील.

दुसरी अफवा कोव्हीड 19 ला चीन ने बनवला आहे.त्यानंतर आता चीन अँटी डॉट बनवणार आणि मग ते पूर्ण जगाला वाटणार.

तिसरी अफवा काय आहे तर पहिलेच माहिती होतं कि कोरोना व्हायरस येणार आहे.1981 मधील पुस्तक The eyes of darkness त्यात एक परिच्छेद दिला आहे कि वूहान 400 नावाच्या शहरामधून एक व्हायरस पसरेल.आणि अमेरिका पण म्हणत आहे कि कोव्हीड 19 चीन ने बनवलं आहे.तयार केलं आहे.अमेरिकेच्या सिनेटच्या सदस्याने टॉम कॉटन यांनी चीन वर बायो वेपण जैविक अस्त्र बनवल्याचा आरोप केला.

रॉबर्ट कोच जे जर्मन चे आहेत त्यांच्यानुसार प्रत्येक देश त्यांच्या लॅब मध्ये जिवाणूंचे परीक्षण करत असतात.आजारांना बरं करण्यासाठी हे करावं लागतं आणि चालू राहणार चालत आले आहे.

अमेरिकेतील एका समूहाने तर चीन वर कितीतरी ट्रिलियन डॉलर चा खटला देखील दाखल केला आहे.आता चीन का शांत बसेल चीन नेपण अमेरिकेवर आरोप केला कि हा व्हायरस अमेरिकेने तयार केला आहे त्यांनी त्यांच्या लॅब मध्ये तयार करून त्यांनी CIA बरोबर हा व्हायरस चीनमध्ये आणला.दुसरीकडे इराण आरोप करतोय.परत अरब म्हणत आहेत कि इस्राईलने कोव्हीड 19 तयार केला आहे.आता तर 5जि पण आलं आहे कायतरी ते जाऊ देऊया ते ते थोडं क्लिष्ट आहे.तर ह्या आहेत सर्व कट सिद्धांत म्हणजे Conspiracy Theory म्हणजे ज्याचा पुरावा नाही फक्त हवेत गोळीबार करायचा.असा कोणताही पुरावा नाही कि चीन ने कोव्हीड 19 तयार केला.चला एका क्षणाला मानू कि हा कोरोना चीन ने तयार केला.पण तरी ह्याबाबदचा कोणताही पुरावा नाहीये.

आणि शाश्त्रज्ञाचं म्हणणं आहे कि WIV जे आहे वूहानमधलं ते बायो वेपन बनवण्यासाठी अयोग्य आहे.तिथे बायो वेपन बनवताच येऊ शकत नाही.

Research Paper by nature

अनेकांच्या मनात येत असेल कि हे काय हा तर चीन ची बाजू घेत आहे.तर मी चीन नाही सायन्स ची बाजू घेत आहे.सगळं सोडा मी जवळ जवळ 3 आर्टिकल वाचलेत कोरोना संदर्भातले तसेच त्यांचे अधिकृत विडिओ हि पहिले खूप न्युज रिपोर्ट सुद्धा पहिले पण 30 मार्चला नेचर कडून जी जगातील अग्रगण्य रिसर्च सेंटरमधील एक आहे त्यांच्या वेब साईट वर एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला त्यात स्पष्टपणे सांगितले आहे कि जेव्हा आम्ही कोरोना हा व्हायरस अभ्यासाला घेतला जेव्हा आम्ही त्याचा परीक्षण केलं तेव्हा आम्हाला तो कृत्रिम नाही वाटला.कोरोना हा संपूर्णपणे नैसर्गिक आहे.हा व्हायरस लॅब मध्ये नाही बनवला गेला.होत काय शास्त्रज्ञ प्रथिनांचा अभ्यास करतात आणि मगच तो प्रकाशित केला जातो.शाश्त्राद्याना सहजपणे सांगू शकतात कि तो व्हायरस जेनेटीकली इंजिनियर म्हणजे कृत्रिमरीत्या बनवला आहे कि नाही.जिथे जिथे हा व्हायरस पसरला आहे तिथल्या शास्त्रज्ञानी हेसांगितले आहे कि असा कुठलाही पुरावा मिळाला नाही कि ज्यावरून असे सिद्ध होईल कि हा व्हायरस कृत्रिमरीत्या बनवला गेला आहे.हा हे आहे कि कुठून आला हे अजून ठोसपणे सांगता आले नाही.म्हणलं जातंय कि वूहानचे जे वेट मार्केट आहे.जिथे सर्व जिवंत प्राणी पक्षी ठेवले जातात आणि तिथेच त्याची कत्तल करून ते विकले जाते तिथून हा आला आहे.साप,वटवागूळ,कुत्रे,अजून काय काय खात असतात काय माहित,तर आत्तापर्यन्त असे म्हणण्यात येत होते कि हा कोरोना वटवागूळपासून आला आहे पण आता जे पांगोलीन असतात खवले मांजर त्याच्यात जो हा व्हायरस आहे त्याला घेऊन जेव्हा त्याचा अभ्यास केला गेला आणि त्याला जेव्हा माणसाच्या आत असलेल्या कोरोनाशी तुलना केली तर tar त्यात खूप साम्य आढळून आली.तर आता हेही म्हणलं जातंय कि खवले मांजर जे आहे पांगोलीन त्यांच्यापासून हा कोव्हीड 19 आला आहे.हे तर पक्क आहे कि कोरोना हे झुनोटिक आहे प्राण्यांपासून माणसात आला आहे.शास्त्रज्ञांच्या मते कोरोना हा विषाणू नैसर्गिक आहे त्याला कोणत्याही लॅब मधून तयार करण्यात नाही आला.आता अजून एक अफवा पसरत आहे कि फक्त वूहान मध्येच का पसरला बीजिंग आणि शांघाय इथं का नाही तर तिथे सुद्धा पसरलाय तिथे सुद्धा बळी गेले आहेत.होतं काय माहिती का ह्या स्टोरीमध्ये आहे मसाला त्याला ह्याला पुरावा नाही मग काही लोक पसरवतात अफवा चायनीज लोक कायपण खातात आणि मग आजार पसरवतात.आणि आत्ता जेवढे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यातले सर्वच शास्त्रज्ञ म्हणत आहेत कि कोरोना हा नैसर्गिक आहे.ह्याचा अर्थ असा नाही कि चीन जबाबदार नाही.नक्कीच चीन जबाबदार आहे.त्यांनी जगाशी लपवून ठेवलं कि असा कायतरी व्हायरस आहे जो माणसातून माणसात संक्रमित होत आहे.त्यात WHO जी आहे जागतिक आरोग्य संघटना तीपण ह्याला जबाबदार आहे.आणि आजही चीन वर आपण पूर्णपणे विश्वास ठेऊ शकत नाही.चीनची मीडिया संपूर्णपणे सरकारच्या हातात आहे,त्यामुळे त्यांची कोरोनाची आकडेवारी हि बरोबर असेल ह्याचीसुद्धा शाश्वती नाही.त्यामुळे झालंय काय लोकांच्या मनात उग्र भावना आहेत मग त्यात होतंय काय कि अफवा पसरत आहे.आपल्याला ह्या अफवांपासून लांब राहायचं आहे आणि आपण कोरोनाला भारतामध्ये वाढण्यापासून कसा रोखू शकू त्यावर लक्ष दिले पाहिजे.आता झालंय काय ह्यावर लस सुद्धा उपलब्ध नाही आणि शास्त्रज्ञांनुसार ती तयार होऊन वितरित कारण्यापर्यंत एक वर्षांचा तरी कालावधी लागेल.तर आपल्याकडे एकच पर्याय आहे कि घरात बसने आणि मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करने हेच आपल्या हातात आहे. -Abhi